Ajit Pawar News : प्रशस्तीपत्र शरद पवारांचे, आमदारकीची मागणी अजितदादांकडे !

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून विदर्भातील अनेक नेते आमदार, मंत्रीपद, विधान परिषद, महामंडळे भोगून पक्षाला आता रामराम ठोकला आहे. हे बघता विदर्भातील निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी..
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शरद पवार यांनी प्रशस्तीपत्र दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट नसताना बाळबुधे हे राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष होते. तब्बल साडेसहा वर्षे ते या पदावर कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी दीक्षाभूमी ते बारामती अशी राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती अभियान यात्रा काढली होती. यात्रेच्या समारोपाला स्वतः शरद पवार उपस्थित होते. शरद पवार यांनी या यात्रेचे कौतुक केले आणि बाळबुधे यांच्या पाठीवर प्रशस्तीची थाप दिली होती. नागपूरमध्ये झालेल्या प्रशिक्षण शिबिराला शरद पवार, अजित पवार,जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ या नेत्यांनी हजेरी लावली होती.

Sharad Pawar, Ajit Pawar
BJP VS Shivsena : भाजपचा माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? आमदारकीसाठी लावली फिल्डिंग

याच दरम्यान ओबीसी विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. या वेळी सर्वच नेत्यांनी ईश्वर बाळबुधे यांच्या कामांची प्रशंसा केली होती. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजित पवार यांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांना बरोबर घेत राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारला पाठींबा दिला. त्यांच्यासोबत विदर्भातून बाळबुधे यांचाही समावेश होता. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांचे समर्थक असल्याने त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Sharad Pawar, Ajit Pawar
Teachers constituency Election : प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने मुख्याध्यापकांना फुटला घाम...काय आहे कारण?

राष्ट्रवादी काँग्रेसमधून विदर्भातील अनेक नेते आमदार, मंत्रीपद, विधान परिषद, महामंडळे भोगून पक्षाला आता रामराम ठोकला आहे. हे बघता विदर्भातील निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार अजित पवार यांचा निवडूण आला नाही. सुनेत्रा पवार बारामतीमधून पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रफुल पटेल यांचे नाव आघाडीवर आहेत. ते विदर्भातील आहेत. विधान परिषदेची उमेदवारी देताना अजित पवार कुठले निकष ठरवतात यावरच बाळबुधे यांची उमेदवारी ठरणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com