State Government News : राज्य सरकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे !

Harshavardhan Sapkal : तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले.
Harshawardhan Sapkal at Akola
Harshawardhan Sapkal at AkolaSarkarnama
Published on
Updated on

Akola District's News : खारघर येथे मागील रविवारी, १६ एप्रिलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता तसेच यासाठी तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही लाखो श्री सदस्यांना मात्र कडक उन्हात तासन तास बसावे लागले, हे दुर्दैव आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. (However, Sri members had to sit for hours in the hot sun)

अकोल्यात सोमवारी पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्री सदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

या गंभीर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे हित लक्षात घेवून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमांतून येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. या ढिसाळ नियोजनामुळे १४ श्री सदस्यांचे मृत्यू झाले आहेत व ५०० पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत.

हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार मात्र सत्य परिस्थिती लपवत आहे. खारघरची घटना महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी आहे. या घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभार आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर राज्य सरकार मात्र महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे.

Harshawardhan Sapkal at Akola
APMC Akola Election : अकोल्यात ठरलं; शिवसेना पाळणार महाविकास आघाडीचा धर्म !

या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सरकार यातून आपली सुटका करून घेऊ पहात आहे. जेव्हा की, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे. खारघर घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकार सत्य परिस्थिती दडवत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली आहे, असे काँग्रेसचे स्पष्ट मत आहे. या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे.

विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, मनपा माजी विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, पुरुषोत्तम दातकर, राज्य सचिव प्रकाश तायडे, महेंद्र गवई, डॉ. सुधीर ढोणे, निखिलेश दिवेकर, तश्वर पटेल, प्रशांत प्रधान, अंकुश गावंडे, मुजाहिद खानसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Harshawardhan Sapkal at Akola
Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

राज्यपालकांकडे तक्रार..

खारघरप्रकरणी सरकारवर (State Government) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदनवजा तक्रार राज्यपालांकडे (Governor) देण्यात आले आहे. त्यात विशेष अधिवेशन (Session) बोलाविण्याची मागणीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली असल्याचे माजी आमदार सपकाळ यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com