ऑनलाइन परीक्षेसासाठी विद्यार्थी आक्रमक, क्रीडा चौकात बस फोडली...

शहरातील (Nagpur) क्रीडा चौकात १०० ते १५० विद्यार्थ्यांनी (Students) एकत्र येत गोंधळ सुरू केला आणि शहर वाहतूक सेवेची एक बस (Bus) फोडली.
Bus, Nagpur
Bus, NagpurSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : येत्या काळात होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा ऑनलाइन (Online) घ्यावी, ही मागणी करीत आज दुपारी १ वाजताच्या सुमारास विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पाहता पाहता विद्यार्थी आक्रमक झाले आणि शहरातील (Nagpur) क्रीडा चौकात १०० ते १५० विद्यार्थ्यांनी एकत्र येत गोंधळ सुरू केला आणि शहर वाहतूक सेवेची एक बस (Bus) फोडली.

ही माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. फोडलेली बस लगेच अजनी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी ६ ते ८ इंचाच्या मोबाईलवर वर्ग करीत आहेत. प्रश्‍न उत्तरे सर्वकाही मोबाईल आणि लॅपटॉपवरच सुरू आहे. आता ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. कारण आतापर्यंतच्या टेस्टसुद्धा ऑनलाइन होत आहेत. आता लिहिण्याचा सराव राहिलेला नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेऊ नये, ऑनलाइनच घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

येवढ्या मोठ्या संख्येने मुले रस्त्यावर उतरली, हे धोकादायक आहे. कोरोना या काळात तर अशा आंदोलनांमुळे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. पालक आणि विद्यार्थी धास्तावलेले आहे. त्यामुळे त्यांना असे अचानक ऑफलाइन परीक्षेला बोलावणे योग्य नाही. गेल्या दोन वर्षांत सरकारने काय केले, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ऑफलाइन परीक्षेच्या तारखा घोषित झाल्यानंतर विद्यार्थी तणावात आले आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मुलांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाइच घ्याव्या, अशी मागणी पालकांचीही आहे. पण विद्यार्थ्यांना आक्रमक होऊ नये, तर त्यांनी संबंधित मंत्री अधिकारी याच्याशी चर्चा करावी, असेही नागपुरातील काही पालकांनी ‘सरकारनामा’ सांगितले.

Bus, Nagpur
नागपूर, पुण्यात जो धक्का बसला तो टाळण्यासाठी भाजपची आतापासूनच पावले..

पालक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय हा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. सरकार आदेश काढून मोकळे झाले. पण कोरोना, ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना शाळा सुरू करीत असल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. सरकारने हा निर्णय घेतला नसता, तर हेच विद्यार्थी घरी बसून अभ्यास करीत असते. पण आधीच घाबरलेले विद्यार्थी आक्रमक झाल्यामुळे आजची स्थिती उद्भवली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ऑफलाइन परीक्षा रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे.

वर्षा गायकवाड यांचे शांततेचे आवाहन..

१०वी आणि १२वी हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्वाचा टप्पा आहे. येथे विद्यार्थ्यांना चिथावतोय कोण, ह प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी आजचे हे आंदोलन घडवून आणले, त्यांनी हा प्रकार त्वरित थांबवावा. विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून कुणीतरी चर्चेसाठी यावे, त्यांचे स्वागत आहे. चर्चा करून निर्णय पुन्हा घेता येईल. आंदोलने करून तोडफोड न करता शांतता बाळगावी, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com