Nagpur Constituency Election Result : सुधाकर अडबालेंनी गाणारांना रोखले, भाजपला मोठा धक्का...

Sunil Kedar : २०२४ मध्ये आणखी मोठे धक्के आमच्या विरोधी पक्षाला बसणार आहेत.
Sudhakar Adbale Mahavikas Aghadi
Sudhakar Adbale Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Division Teachers Constituency Elections : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. या विजयाने महाविकास आघाडीने भाजपला पुन्हा एक जोरदार धक्का दिला आहे.

पदविधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकोप्याचे दर्शन घडवित भाजपला (BJP) भूईसपाट केले होते. त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने एक एक पाऊल फुंकून फुंकून टाकले. तरीही भाजप हा मतदारसंघ वाचवू शकली नाही. हा पराभव म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचे पडसाद पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आम्ही जेव्हा टीम म्हणून काम करतो, तेव्हा त्याचे निकाल काय लागतात, हे जिल्हा परिषदेची निवडणूक, जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अभिजित वंजारी यांचा विजय आणि त्यानंतर आता नागपूर शिक्षक मतदारसंघातील सुधाकर अडबाले यांच्या विजयाने दाखवून दिले आहे. हा महाविकास आघाडीच्या एकोप्याचा विजय आहे. हा एकोपा कायमस्वरुपी राहणार आहे. २०२४ मध्ये आणखी मोठे धक्के आमच्या विरोधी पक्षाला बसणार आहेत. कोण हरणार, हे सांगू शकत नाही. पण आम्ही विजयी होणार, हे निश्‍चित असल्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी सांगितले.

Sudhakar Adbale Mahavikas Aghadi
Teacher-Graduate Election Results : महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आघाडीवर : भाजपला धक्का!

आजच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असलेले बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकत्र राहिलो. आम्ही पूर्वीपासून कॉंग्रेसच्या विचारांचे आहोत. सर्वच्या सर्व ३४ संघटनांना आम्ही एकत्रित केले. त्यांच्यात एकमत घडवून आणले. सुधाकर अडबालेंना उमेदवारी दिली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे भूमिका मांडली. आम्ही त्यांच्याच विचाराचे आहो, हे त्यांना सांगितले. शिक्षक मतदारसंघ हा संघटनांचा मतदारसंघ आहे, राजकीय नाही, हे आम्ही कॉंग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिले. यामध्ये आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी यांनी ते मान्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com