Teacher-Graduate Election Results : महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आघाडीवर : भाजपला धक्का!

BJP Vs MVA : भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा विजय!
Teacher-Graduate Election Results | Mahavikas Aghadi | BJP
Teacher-Graduate Election Results | Mahavikas Aghadi | BJPsarkarnama
Published on
Updated on

Election News: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकांसाठी नुकतेच मतदान पार पडले. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले. आज निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. प्रत्यक्ष मतमोजणी होताना महाविकास आघाडी पुढे असलेले दिसून येत आहे.

भाजपने कोकण शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला आहे. यामुळे भाजपने आतापर्यंत एक जागा राखली आहे. तर अमरावती पदवीधर मध्ये काँग्रेसचे धिरज लिंगाडे दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळेंनी मोठी आघाडी घेतली आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघातही महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी विजय मिळवला आहे, भाजपचे नागो गाणार यांचा पराभव झाला आहे.

Teacher-Graduate Election Results | Mahavikas Aghadi | BJP
Amravati News: रणजीत पाटलांचा वारू लिंगाडे रोखणार का? मतमोजणीस प्रारंभ...

नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी मोठी आघाडी घेतली असून महाविकास आघाडीचे शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत. सत्यजीत तांबे यांना पहिल्या पहिल्या फेरी

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीत मतदान पार पडल्यावर आज निकाल जाहीर होणार आहे.

Teacher-Graduate Election Results | Mahavikas Aghadi | BJP
MVA News: सुधाकर अडबाले विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपसाठी धोक्याची घंटा?

यामुळे या निवडणुकीत सुरूवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडी भाजपच्या पुढे असलेले दिसून येते. हे कल असेच राहिले तर महाविकास भाजप आणि शिंदे गटाच्या युतीवर मात करत अधिक चांगली कामगिरी करणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com