Sudhir Mungantiwar Controversial Statement: भाजपचे चंद्रपूरचे (Chandrapur) उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे चंद्रपुरमध्ये आले होते. त्यादिवशीच्या प्रचारसभेत मुनगंटीवार यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक सडकून टीका करत आहेत. शिवाय मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही विरोधक करत आहेत.
तर काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट सावंत यांनी थेट निवडणूक आयोगाला (Election Commission) टॅग केली आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याच पोस्टची दखल आता निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यामुळे आता मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगावने सावंत यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये, 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.' असं लिहिलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मुनगंटीवारांच्या प्रचारसभेतील आक्षेपार्ह भाषणाचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत लिहलं, "निवडणूक आयोगाने तत्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच "आप"च्या मंत्री आतिशी यांनी भाजपने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली.
जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल." असं सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विटची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, "आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या ॲपवर तक्रार दाखल करू शकता. प्रत्येक तक्रारीवर 100 मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही" निवडणूक आयोगाच्या या उत्तरामुळे आता मुनगंटीवार यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या वक्तव्याशी छेडछाड करुन अर्धवट क्लिप व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, "1984 साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही.
1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही. वंदे मातरम!" असं ट्विट करत मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
(Edited By jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.