Sanjay Raut On Raj Thackray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यातून नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केलं. राज यांच्या या भूमिकेवर आता राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
भाजपने या भूमिकेचं स्वागत केलं आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाराष्ट्राची मागील काही दिवसापासून लूट सुरू आहे. राज्यात खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू असून नरेंद्र मोदी आणि अमित शहा (Narendra Modi and Amit Shaha) याचे सूत्रधार आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढत आहोत. आम्ही मोदी आणि शहा यांच्याशी लढत आहोत. तसेच आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजपसोबत (BJP) राहिलो नाही. भाजपने जेव्हा खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही त्यांचा जबडा फाडून बाहेर आलो आणि स्वतंत्र राहिलो. आजही आमची भूमिका महाराष्ट्रासंदर्भात स्पष्ट आहे. जर कुणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर शिवसेना (Shivsena) त्याचा विरोध करेल. पण तुमची कोणती फाईल उघडी ज्यामुळे नवनिर्माण पक्षाचे नमोनिर्माण झालं, असा टोलाही राऊतांनी लगावला.
यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज यांच्या राजकीय व्याभिचार शब्दाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले राजकीय व्याभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणातून समजून घेतलं पाहिजे. अजित पवार (Ajit Pawar), हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत, ज्यांनी बिनशर्थ भाजपसोबत जायचं मान्य केलं. ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे.
राज्यातील ओवाळून टाकलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपने आपल्यात सामावून घेतलं आहे. त्यातले हे एक 'नमो'निर्माणवाले आहेत का? पण तसं मला वाटत नाही. राज्यातले सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंडांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणे हा व्याभिचार नाही का? आणि अशा व्याभिचारी व्यासपीठावर तुम्ही पाऊल ठेवले असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल, असा परखड सवाल राऊतांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे
आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो. ठाकरे हे असं नाव आहे त्यांना कोणी झुकवू शकत नाही. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) झुकविण्याचा प्रयत्न झाला ते झुकले नाहीत .आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही तुटलो नाही. त्यांच्याशी लडतो आहोत महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे, असंही राऊत म्हणाले.
यावेळी राऊतांनी सांगलीच्या जागेबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, विशाल पाटील (Vishal Patil) हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील आहेत. वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील पितामह आहेत. विशाल पाटील यांनी 2019 सांगलीतून उभे होते परंतु ते पडले, आता ते परत अशी चूक करतील असे वाटत नाही. सर्वकाही ठीक होईल आमच्यासाठी काहीही अवघड नाही, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.