Sudhir Mungantiwar News : पाटण्याच्या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार जरी जाहीर केला, तरीही बैठक महत्वाची होती असं समजू…

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांना पुरस्कार देण्याबद्दल काँग्रेसच्या मनात नेहमीच अडचण होती.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
Published on
Updated on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील स्मारकाला ऑटोनॉमस दर्जा द्यावा, याचा अर्थ त्यावर शासकीय नियंत्रण शिथिल करून ट्रस्ट बनवावी. ट्रस्ट बनल्यावर लंडनमध्ये जाणाऱ्या भारतीय तरुणांना ऊर्जा घेऊन, प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात कार्य करता येईल, असे राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार मोदी ९चा मध्यप्रदेश दौरा आटोपून आज (ता. २२) नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बाबासाहेबांना पुरस्कार देण्याबद्दल काँग्रेसच्या मनात नेहमीच अडचण होती.

नेहरूंनी स्वतःला पुरस्कार मिळवून घेतले. ते म्हणजे एका हाताने दुसऱ्या हाताला पुरस्कार देण्यासारखे झाले. मात्र डॉ. आंबेडकर यांना पुरस्कार दिला नाही. बाबासाहेबांच्या लंडनमधील स्मारकासंदर्भात जे कोणी मागणी करत आहेत, ते राज्य आणि केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाशी चर्चा करतील.

जिवतोडे, राजुरकर भाजपमध्ये येणार..

महाराष्ट्रात भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. चंद्रपूरमधील ओबीसी समाजाचे नेते आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत २५ हजारावर मते घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजुरकर या दोघांसह हजारो कार्यकर्ते येत्या रविवारी (ता. २५) भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar News : छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे फोटो झळकवाल, तर आम्ही काय फक्त निवेदने देऊ का?

पाटणा होत असलेली भाजपच्या सर्व विरोधकांची बैठक होणार आहे, याबाबत विचारले असता, ती बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीमध्ये त्यांनी फक्त भविष्यात त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे जरी जाहीर केलं तर ही बैठक महत्त्वाची म्हणता येईल, असा टोला मंत्री मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) विरोधकांना लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या होत्या की, फडणवीसांचं (Devendra Fadanvis) सरकार जाणीवपूर्वक अपमान करण्याचे काम करतात. जाहिरात प्रकरणावरून त्यांनी हा टोला लगावला होता. याबाबत विचारले असता, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एवढी काळजी घेतली, चांगलं आहे. अशीच काळजी त्यांनी २०२४मध्येही करावी. जेणेकरून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा टोमणा मुनगंटीवार यांनी मारला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com