Sudhir Mungantivar News : मुनगंटीवार यांना शह; आमदार जोरगेवारांचा भाजपमध्ये प्रवेश

Political News : दिल्लीलासुद्धा ते जाऊन आले, असे असतानाही पक्षाने जोरगेवार यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मुनगंटीवार यांच्याच उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा मुनगंटीवार यांना शह मानला जात आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याचे वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने जोरदार धक्का दिला आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात प्रवेश घेण्यास त्यांचा प्रचंड विरोध होता. कालपर्यंत त्यांचा विरोध कायम होता. याकरिता दिल्लीलासुद्धा ते जाऊन आले, असे असतानाही पक्षाने जोरगेवार यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मुनगंटीवार यांच्याच उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा मुनगंटीवार यांना शह मानला जात आहे.

आमदार जोरगेवार यांच्या भाजप (BJP) प्रवेशाला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी वेळोवेळी विरोध दर्शवला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचालायच्या का ? असा त्यांचा सवाल होता. त्यांची निष्ठाही तपासून बघावी अशी सूचनाही त्यांनी केली होती. असे असतानाही त्यांचा प्रवेश होत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांना शह मानला जातो. (Sudhir Mungantivar News)

जोरगेवार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. अपक्ष निवडून येण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी भाजपमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला आहे. चंद्रपूरमधील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांचे सूर जुळले नाहीत.

सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी ताणून धरले होते. भाजपच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार यांना पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

Sudhir Mungantiwar
MVA News : परंडा मतदारसंघावरून आघाडीत ठिणगी; मोटे, रणजित पाटील दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम

विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करणे सुरू केले. मुनगंटीवर यांचीसुद्धा मनापासून इच्छा नव्हती. हे बघता त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला.

शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. हे कळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध करणे सुरू केले. लोकसभेच्या निवडणुकीत जोरगेवार यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले होते. त्यांना प्रवेश कसा काय द्यायचा ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Sudhir Mungantiwar
MVA News : 'या' दहा जागांमुळेच बिघडतोय महाविकास आघाडीचा खेळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com