Sunil Kedar Big News : राज्य सरकार काँग्रेसच्या सुनील केदारांना झटका देणार; 'या' प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Nagpur District Bank Scam : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार आणि इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या170 कोटी रुपयांच्या घोटाळा उघडकीस आला होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी सावनेरचे काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांच्यासह इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. आता राज्य सरकार महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

एकीकडे आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याचदरम्यान, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमोर सुनावणी झाली.

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील ॲड. नीरज जावडे यांनी या खटल्यात काँग्रेस (Congress) नेते सुनील केदारांविरोधात सरकार वरीष्ठ वकील नियुक्त करणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 जुलैपर्यंत वेळ देण्याची विनंती केली आहे.

सुनील केदार यांचे वकील सुरेंद्र कुमार मिश्रा यांनी सरकारवर गंभीर आरोप करतानाच विलंबाचा डावपेच खेळल्याचं म्हटलं होतं. आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करता येत नसेल तर सरकारी वकील देवेन चौहान यांनी युक्तिवाद करावा अशी विनंती केली होती.यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचे दाखले दिला होता.

Sunil Kedar
Modi Government News : निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी मोदी सरकारचा मतदारांना मोठा दिलासा

याप्रकरणी सुरुवातीला सरकार ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांना पाठवण्याचा विचार केला होता पण वेळेच्या कमतरतेमुळे हा निर्णय सोडून दिला होता. त्यामुळे केदार यांचे वकील एस. के. मिश्रा यांनी या प्रकरणी तत्काळ निर्णय होणे गरजेचा असल्याचा मुद्दा उचलून धरला. तसेच सरकारला 3 जुलैपर्यंतचा वेळ वाढून देण्यासही विरोध केला. त्यामुळे कोर्टाने सरकारला येत्या गुरुवारपर्यंतच वेळ दिला.

राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता वरिष्ठ ॲड. बिरेंद्र सराफ बाजू मांडतील हे आधी न्यायालयात याप्रकरणी युक्तिवाद करणार होते. मात्र,सध्या ते इतर काही महत्वाच्या प्रकरणांत गुंतल्यामुळे सरकारने अन्य वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी सौम्य शिक्षेची मागणी करत वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली आहे.केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता.मात्र,न्यायालयाने केदार यांना तब्बल 6 वर्षांची शिक्षा सुनावली आणि साडेबारा लाखांचा दंडही ठोठावला आहे.

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार आणि इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टानं सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष) यांच्यासोबत केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरवलं होते.

Sunil Kedar
Dhairyasheel Mohite Patil : मोहित पाटील घराण्यातील चौथ्या खासदाराने मराठीतून घेतली शपथ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com