Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

Rahul Gandhi News: राहुल गांधींचे सामाजिक काम आणि त्यांनी दिलेला शब्द पक्का आहे.
Vijay Wadettiwar and Amit Shah
Vijay Wadettiwar and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

The country is being run by lying : गृहमंत्री देशाला किती चुकीची माहिती देतात आणि किती ठासून खोटे बोलतात, हे कलावतीच्या कालच्या वक्तव्यावरून आपल्याला समजले आहे. संपूर्ण देशाने या सरकारचा खोटेपणा पाहिला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमित शाह यांच्यावर तोफ डागली. (The court has granted bail to Nawab Malik and the truth has won)

आज (ता. ११) नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राहुल गांधींचे सामाजिक काम आणि त्यांनी दिलेला शब्द पक्का आहे, हे देशवासीयांना माहिती आहे. केवळ कलावतीच नाही तर निर्भयाच्या भावाला पायलट बनवण्याचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या सत्य नाही तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. गृहमंत्र्यांच्या भाषणातून हे देशाला कळून चुकले आहे.

नवाब मलिक यांना जामीन मिळताच ‘सत्य परेशान हो सकता है लेकिन छूप नही सकता’, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. आज न्यायालयाने नवाब मलिकांना जामीन देऊन सत्याचा विजय केला आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात षड्यन्त्र करत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण सर्वोच न्यायालयाने सत्याचा बाजूने निर्णय दिल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

पुरावेच नसतील तर विरोध कशाच्या आधारावर करतील आणि न्यायालय तरी कशाला ते ऐकणार. अनिल देशमुख यांच्या संदर्भात काय पुरावे मिळाले. १०० कोटींचा आरोप केला, पण त्यात तथ्य नव्हते, हेच शेवटी सिद्ध झाले. परमवीर सिंग मोकळा फिरत आहे. हे सगळं राजकीय आवाज दाबण्यासाठी झालं आहे. पण त्यांचे इरादे पूर्ण होऊ देणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar and Amit Shah
Vijay Wadettiwar Statement: विदर्भात आघाडीचे ४५ आमदार दिसतील; वडेट्टीवारांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत माहिती जाणून घेण्यासाठी आज (ता. ११) नागपूरची बैठक घेतल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. या बैठकीला ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. काँग्रेसचे नेते नितीन राऊत वैयक्तिक कामासाठी गेल्यानं उपस्थित राहणार नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. नितीन राऊत असतील, असेही ते म्हणाले.

ब्लॉक अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. काय परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला. प्रभागवार समीक्षा केली. समितीचे गठन झालेले आहे का याची माहिती जाणून घेतली. बदलत्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्रात (Maharashtra) विरोधी पक्ष म्हणून तसेच आमच्या मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे. त्यावरसुद्धा या बैठकीत चर्चा झाली.

Vijay Wadettiwar and Amit Shah
Vijay Wadettiwar On BJP : "जनता तुम्हाला नाकारतीये" | Congress | Nagpur | Sarkarnama Video

नागपूर (Nagpur) लोकसभा काँग्रेसच्या वाट्याला अनेक वर्षांपासून आहे. त्यात वाटाघाटीनंतर चर्चेअंती आम्ही राज्य आणि केंद्रस्तरावर बैठका होतील. या मतदारसंघाची वस्तुनिष्ठ माहिती वरिष्ठ नेत्यापुढे मांडण्यासाठी माहिती घेण्याचा बैठकीचा उद्देश आहे. सगळी माहिती आम्ही आज घेतली. अंतिम अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सोपवणार असल्याचे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com