Nagpur NDCCB Sacm : सुनील केदार कारागृहात; सत्र न्यायालयाचा शनिवारी फैसला

Nagpur District Central Coop Bank Scam Sunil Kedar In Jail : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपिल....
Nagpur NDCCB Sacm
Nagpur NDCCB SacmSarkarnama
Published on
Updated on

Sunil Kedar Update News : बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (NDCCB) मुख्य न्यायदंडाधिकारी कार्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या माजी मंत्री सुनील केदार यांच्या अपिलावर सत्र न्यायालय शनिवारी (ता. 30) निकाल सुनावणार आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर केदार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) दाखल करण्यात आले होते. गुरुवारी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्यांना ‘फिट’ घोषित करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून सुटी मिळताच केदार यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

Nagpur NDCCB Sacm
Sunil Kedar News : तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदारांचे पोस्टर झळकले; काँग्रेस महारॅलीत कट्टर समर्थकांचा..

रोखे घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी गुरुवारी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला. केदार यांच्या वकिलांनी शिक्षेला स्थगिती व जामिनासाठीच्या अर्जावर गुरुवारी पुर्सीस अर्ज दाखल केला. न्यायाधीश भोसले यांनी त्यावरील सुनावणी दुपारपर्यंत तहकूब केली. त्यानंतर सरकारी वकिल अजय मिसर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहू शकत नसल्याने सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली.

सायंकाळच्या सुमारास अॅड. मिसर यांनी मुंबईतून व्हीसीद्वारे बाजू मांडली. सरकारी पक्षाने कोर्टाला सांगितले की, केदार यांचा सत्र न्यायालयात अर्ज दाखल असताना त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. केदार यांचे वकिल देवेंद्र चव्हाण यांनी त्यावर न्यायालयाला सांगितले की, सत्र न्यायालयात दाखल अर्जावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा लागला. बचाव पक्षाने याबाबत कळविले नाही, त्यामुळे ते गुन्हेगारी कृत्य ठरत नाही.

शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मंगळवारी (ता. 26) निर्णयाची प्रत मिळाली. त्यानंतर जामिनासाठी सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने ही बाजू समजून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. ( Nagpur District Central Cooperative Bank ) केदार यांना जन्मठेप किंवा दहा वर्षांची शिक्षा झालेली नाही. अशात सरकारी पक्षाची बाजू ऐकण्यात काही अर्थ नाही, असेही अॅड. चव्हाण यांनी सांगितले. बराच वेळपर्यंत सत्र न्यायालयात या युक्तीवाद सुरू होता. केदार यांच्यावतीने अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. अजय मिसर, अॅड. नितीन तेलगोट यांनी युक्तीवाद केला. अजय चौधरी यांच्यावतीने अॅड. तहसील मिर्झा यांनी कोर्टात बाजू मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युक्तीवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालय आता शनिवारी याबाबत आपला निकाल जाहीर करणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच मेडिकलमधील डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी केदार यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असून रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ देण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे केदार यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ मिळताच नियमाप्रमाणे ‘जेलपास’ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारागृहाबाहेर गर्दी

केदार यांना पोलिसांच्या वाहनातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर झाला, त्यादिवशी केदार यांचे समर्थक पूर्णवेळ त्यांच्यासोबत होते. रुग्णालयाबाहेरही त्यांनी तळ ठोकला होता. गुरुवारी केदारांना रुग्णालयातून कारागृहात आणल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली. प्रसार माध्यमांचीही गर्दी येथे होती. या सर्वांना पोलिसांनी वर्धा मार्गावरील ‘नीरी’च्या दिशेने असलेल्या प्रवेश द्वाराबाहेरच रोखले.

edited by sachin fulpagare

Nagpur NDCCB Sacm
Nagpur NDCCB Bank : युक्तिवाद पूर्ण, केदारांचे भवितव्य निकालावर अवलंबून

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com