Nagpur NDCCB Bank : युक्तिवाद पूर्ण, केदारांचे भवितव्य निकालावर अवलंबून

High Court : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालास दिले आव्हान
Sunil Kedar Case in High Court.
Sunil Kedar Case in High Court.Sarkarnama

Sunil Kedar : बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (NDCCB) मुख्य न्यायदंडाधिकारी कार्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांनी निकालाविरोधात सत्र न्यायालायत धाव घेतली आहे. शिक्षा झाल्यानंतर काँग्रेसचे नागपुरातील दिग्गज नेते तथा माजी मंत्री सुनील केदार सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत. कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी आमदारकीही विधिमंडळ सचिवालयाचे रद्द केली आहे.

स्थानिक न्यायालयाच्या निकालाविरोधात केदार यांनी स्थगिती व जामिन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी (ता. 22) न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्यामुळे केदार यांना अपिल करता आले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (ता. 26) केदार यांच्या वकिलांनी न्यायालयात अपिल दाखल केले.

Sunil Kedar Case in High Court.
Nagpur NDCCB Bank : घोटाळा भोवला; माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा!

न्यायालयाने याबाबत सरकारी पक्ष व केदार यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या निकालावरील युक्तिवाद मंगळवारी आटोपला. आता त्यावर सत्र न्यायालय कोणता निर्णय घेणार यावर केदार यांचे भवितव्य अवलंबून आहे. दोन दिवसांत न्यायालय केव्हाही निकाल जाहीर करू शकते असे वकिलांनी सांगितले. युक्तिवाद करताना राहुल गांधी विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू प्रकरणाचे दाखले केदार यांच्या वकिलांनी दिले, त्यावर सरकारी वकिल नितीन तेलगोटे यांनी आक्षेप घेतला.

मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने सुनावलेली शिक्षा अयोग्य असल्याचे केदार यांच्या वकिलांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. केदार यांच्या वकिलांनी शिक्षेच्या आदेशाला स्थगितीसह जामिन मंजूर करण्याची विनंती केली. केदार यांच्या वकिलांकडून एकाच खटल्यात शिक्षेला स्थगिती आणि जामिनाची मागणी करण्यात आली आहे. इतर पाच आरोपींनी फक्त जामिन मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. दंडाच्या रकमेलाही त्यांनी स्थगिती मिळावी, अशी विनंली केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केदारांनी भरला दंड

मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार केदार यांनी 12.50 लाख रुपयांच्या दंडाची भरणा केली आहे, असे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्यावर सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात न्यायनिवाडा करताना काही मुद्दे स्पष्ट केले आहे. त्यानुसार शिक्षेला स्थगिती देण्याचा अधिकार फक्त हायकोर्टाला आहे. केदारांच्या वकिलांनी सांगितले की, सत्र न्यायालयालाही शिक्षेला स्थगिती देण्याचा अधिकार आहे.

शिक्षेला स्थगिती आणि जामिनावरील दोन्ही पक्षांचे म्हणणे पूर्ण झाले आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाची तेवढी प्रतीक्षा आहे. न्यायालयाने केदार यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांना राज्य विधिमंडळाकडून पुन्हा आमदारकी बहाल करावी लागणार आहे. याशिवाय जामिन मंजूर झाल्यास त्यांना मोठा दिलासाही मिळेल. मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने निकालात कोणत्याही त्रुटी शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर तो शुक्रवारी जाहीर करण्यात आला. अशात सत्र न्यायालय केदारांच्या भवितव्याबाबत कोणता निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Sunil Kedar Case in High Court.
Nagpur NDCCB Bank : शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच सुनील केदार आजारी

तापासोबतच श्वसनमार्गात संक्रमण

शिक्षा झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार घेत असलेले सुनील केदार यांना 102 डिग्री ताप आहे. त्यांच्यावर एन्जिओग्राफी करता येईल का, याबाबतची शक्यता तपासली जाणार आहे. केदार यांच्या क्ष-किरण (X-Ray) तपासणीत न्युमोनियाची प्राथमिक लक्षणे आढळली आहेत. श्वसनमार्गातही संक्रमण आढळले आहे. क्रिएटिनिनमध्येही वाढ झाली आहे. अशात एन्जिओग्राफी करताना द्याव्या लागणाऱ्या ‘डाय’मुळे मूत्रपिंडाला धोका होऊ शकतो. त्यामुळे यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या केदार पाच दिवसांच्या ‘अॅन्टीबायोटिक्स’वर आहेत. मायग्रेनच्या त्रासामुळे गरजेनुसार त्यांना ‘ऑक्सिजन’ही दिले जात आहे.

Edited by : Atul Mehere

Sunil Kedar Case in High Court.
MLA Sunil Kedar: मोठी बातमी! काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com