सुनील केदार म्हणाले, जे राज्यात होऊ शकले नाही, ते नागपुरात घडले...

विधानसभेत काही जागांवर परिणाम झाला, अशी कबुली देत खऱ्या अर्थाने निवडणूक लढली का, असा सवाल मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केला.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : एकत्रितपणे लढल्यास कॉंग्रेसचा विजय दूर नाही. याकडे सर्व नेत्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत आम्ही एकत्रितपणे लढलो, त्याचा सकारात्मक परिणाम झाला. जे राज्यात होऊ शकले नाही, ते नागपुरात घडले. यात धर्तीवर राज्यभर निवडणुकांना सामोरे गेल्यास पक्षाला गतवैभव मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.

पक्षातील नेते एकमेकांना समजले नाही किंवा समजण्याच्या पलीकडे होते. त्यामुळे विधानसभेत काही जागांवर परिणाम झाला, अशी कबुली देत खऱ्या अर्थाने निवडणूक लढली का, असा सवाल मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केला. जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटी ओबीसी विभाग नागपूर ग्रामीणचा पदग्रहण सोहळा काल वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, अवंतिका लेकुरवाळे, विजया धोटे, शांता कुमरे, तक्षशिला वाघधरे, दुधराम सव्वालाखे उपस्थित होते. पुढे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले की, २०१४ ते २०१९ काळात सर्वत्र भाजप सत्तेत होती. त्यानंतरही काँग्रेसने चांगली कामगिरी केली.

जिल्हा परिषदेत एकत्रितपणे लढल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. जे राज्यात झाले नाही, ते नागपुरात घडले. एखादा बदल घडवायचा असेल तर प्रबोधनाची मोठी गरज आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या माध्यमातून तो करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी झुंड चित्रपटात काम करणाऱ्‍या जिल्हा परिषदेच्या सदस्या शांता कुमरे व तक्षशिला वाघधरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संचालन दुधराम सव्वालाखे यांनी केले.

Sunil Kedar
सुनील केदार म्हणाले, आता ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल...

ओबीसींना संपविण्याचे कारस्थान : मुळक

जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक म्हणाले की, मोदी व फडणवीसांकडून ओबीसींना संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. इम्पेरिकल डेटा भाजपच्या काळात गोळा केला नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ओबीसी जनगणनेचा मुद्दा यावा, यासाठी विदर्भाचे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेईल, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com