Sunil Kedar : राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी त्यांचे पुत्र, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र, पक्षाने नितीन राऊत यांनीच लढावे, असे निर्देश दिले होते. तत्पूर्वी, माजी मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने त्यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठवावा, यासाठी दबाव टाकला होता. बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने केदार यांचे काँग्रेस कमिटी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघावर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दरम्यान, भाजपच्या वतीने बर्वे यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवाराची गॅरंटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली होती. त्यांनी जिल्हा बॅंकेचे संचालक आणि नाना पटोलेंचे राजकीय गुरू स्व. यादवराव पडोळे यांचे पुत्र प्रशांत पडोळे यांचे नाव पाठविले होते. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मतदारसंघात नाना पटोले आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल यांचे वर्चस्व आहे. दोघांनीही आलटून पालटून हा मतदारसंघ जिंकला आहे. त्यामुळे येथे बरोबरीचा मुकाबला होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसने नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, रामटेक लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून नामदेव किरसान यांनी नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. हे उमेदवार उद्या (ता. 27) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
ठाकरे, बर्वे आणि किरसान यांच्या नावांची आधीपासूनच चर्चा होती. विकास ठाकरे यांनी दोन दिवसांपासून प्रचाराला सुरुवातदेखील केली होती. गडकरी आणि ठाकरे यांनी एकमेकांना शुभेच्छादेखील दिल्या होत्या. मात्र, अधिकृत घोषणा व्हायची असल्याने ठाकरे समर्थक चांगलेच धास्तावले होते. मात्र, काँग्रेसने उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता गडकरी यांचा थेट मुकाबला विकास ठाकरे यांच्यासोबत होणार आहे. 2014च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी नितीन गडकरींचे मताधिक्य 2014च्या तुलनेत जवळपास ७० हजारांनी कमी केले होते. या वेळी विकास ठाकरे काय करतात, हे पाहणे आैत्स्युक्याचे ठरणार आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.