Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक जिल्हा परिषदेनंतर आता रश्मी बर्वे यांची दिल्ली गाठण्याची तयारी

Lok Sabha Election 2024 : सुनील केदारांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्‍मी बर्वेंना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडे केली आहे.
rashmi barve
rashmi barvesarkarnama
Published on
Updated on

संदीप गौरखेडे

रश्मी बर्वे या महाराष्ट्राचे माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक आहेत. रश्मी बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आरूढ होताच बर्वे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सुनील केदार यांनी त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी प्रस्तावित केले. खुद्द केदारांनीच पुढाकार घेतल्यामुळे त्यांची निवड सहजासहजी झाली होती. अडीच वर्षांच्या कारकिर्दीत बर्वेंनी जिल्ह्याच्या नागरिकांसाठी चांगले निर्णय घेतले. आता केदारांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्‍मी बर्वेंना ( Rashmi Barve ) उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडे केली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही जागा निवडून आणण्यासाठी केदार यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असून, त्यासाठी त्यांनी तयारी केली आहे. Lok Sabha Election 2024

rashmi barve
Buldhana Lok Sabha Constituency: 'वन मिशन बुलढाणा'च्या बळावर संदीप शेळके नशीब आजमावणार

नाव (Name) :

रश्मी शामकुमार बर्वे

जन्मतारीख (Birth Date) :

31 डिसेंबर 1987

शिक्षण (Education) :

बीए

कौटुंबिक पार्श्वभूमी? (Family Background) :

रश्मी बर्वे यांचे पती शामकुमार बर्वे 10 ते 15 वर्षे कांद्री (कन्हान, जि. नागपूर) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य होते. 2020 मध्ये ते उपसरपंच बनले. त्याचबरोबर ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. ते सुनील केदार यांचे विश्वासू सहकारी आहेत. 20 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. त्याचेच फळ म्हणून 2019 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले.

रश्‍मी बर्वे यांचे माहेर नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील खरसोली येथील आहे. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले. वारले. त्यांना भाऊ नाही. आई गृहिणी आहे. बहीण शिक्षिका आहे. त्यांना एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. सासू राजीना तर सासऱ्यांचे नाव दौलतराव बर्वे आहे. दौलतराव 2012 मध्ये वेकोलीमधून निवृत्त झाले. त्यांना दोन नणंदा असून, एक अमरावतीला पोलिस निरीक्षक तर लहान नणंद प्राध्यापक आहेत. दोघीही विवाहित आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business) :

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency) :

रामटेक

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation) :

काँग्रेस

आतापर्यंत कोणत्या निवडणुका लढवल्या ? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Elections Contested or Political Journey) :

रश्मी बर्वे यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. जुनी कामठी-टेकाडी या जिल्हा परिषद गटातून त्या निवडून आल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. रश्मी यांचे पती शामकुमार हे सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे विश्‍वासू असल्याने त्यांना थेट अध्यक्षपद मिळाले. त्यांनी अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. आता त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.

rashmi barve
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

रश्मी बर्वे यांनी काँग्रेस पक्षासाठी महिलांचे संघटन मजबूत केले. महिला मेळावे, रोजगार मेळावे आदी उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. सुनील केदार हे पशुसंवर्धन मंत्री असताना पशुधन वाटप मोठ्या प्रमाणात केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून दिला. दिव्यांगांसाठी शिबिरे आयोजित करून त्यांना प्रमाणपत्र आणि यूआयडी कार्ड वाटप करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळ कनेक्शन देण्यात आले.

नवीन बोअरवेल करणे म्हणजे अधिक खर्च लागतो. म्हणून बंद पडलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करून त्या सुरू करण्यात आल्या. त्यातून शासनाचा बराच पैसा वाचला. या कार्यामुळे शासनाने चांगल्या कामाची पावती देत कौतुक केले. कोरोना काळात ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा वाढवून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता भासू दिली नाही. कोरोना काळात ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना सतत भेटी दिल्या. डॉक्टरांचे मनोबल वाढविले. ग्रामीण भागातील गरजूंना सातत्याने मदत केली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election) :

निवडणूक लढविली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

निवडणूक लढविली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे ? (Public Relation in Constituency) :

महिला मेळावे, रोजगार मेळाव्यांसह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून रश्मी बर्वे यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संपर्क वाढवला आहे. जनसंपर्क केवळ निवडणुकीसाठी नसावा, तर लोकांची कामे होत राहिली पाहिजेत. त्यामध्ये सातत्य असावे, यासाठी आपला जिल्हा परिषद गट आणि संपूर्ण जिल्ह्यात त्या नियमित दौरे करत असतात. मतदारसंघातील घरोघरी त्यांचा संपर्क आहे. त्यांच्याकडे काम घेऊन आलेल्या लोकांना त्या नावानिशी ओळखतात. एकंदरीतच निवडणुका असो किंवा नसो, त्या कायम जिल्ह्यातील लोकांच्या संपर्कात राहतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

रश्मी बर्वे या व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ‘एक्स’ यावर नेहमी सक्रिय असतात. विविध उपक्रम असो की कार्यक्रम याची प्रसिद्धी सोशल मीडियातून केली जाते. मतदारसंघातील सोहळे असो किंवा कार्यकर्त्यांचे कौतुक सोशल मीडियावर त्याची छायाचित्रे झळकत असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

रश्मी बर्वे यांना आतापर्यंतच्या कारकिर्दीत वादग्रस्त वक्तव्ये टाळली आहेत.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru) :

माजी मंत्री सुनील केदार

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate) :

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी रश्मी बर्वे यांचे नाव पुढे केले आहे. कामाच्या पावतीवर उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांना आहे. महिला असल्याने त्या महिलांचे प्रश्न समजून घेऊ शकतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा त्यांचा मानस आहे. बचत गटातील महिलांना व्यवसाय, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. शासकीय इमारत तयार करून महिलांसाठी प्रशिक्षण भवन उभारण्याचा त्यांचा मानस आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांच्या पिकांना हमीभाव कसा मिळवून देता येईल, यासाठीचे नियोजन तयार आहे. मतदारसंघातील बंद पडलेले उद्योग पूर्ववत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

माजी मंत्री सुनील केदार यांनी रश्‍मी बर्वे यांचे नाव रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी रेटले आहे. याला काही काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. या गटबाजीचा फटका बर्वे यांना आगामी निवडणुकीत बसू शकतो. बर्वे यांनी निवडणूक लढवल्यास त्यांना अंतर्गत विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. विरोध मोडून काढण्यासाठी राजकीय कौशल्य वापरावे लागणार आहे. सुनील केदार यांनी बर्वेंना जेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवले, तेव्हाही त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता. तसाच विरोध लोकसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे.

rashmi barve
Ramtek Lok Sabha Constituency : किशोर गजभिये यांना यंदा तरी दिल्लीवारीची संधी मिळेल का?

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn't get chance to contest Lok Sabha election what will be the consequences) :

रश्‍मी बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास सुनील केदार जी भूमिका घेतील, त्यांच्यासोबत त्या राहतील. काँग्रेसने येथे जर दुसरा उमेदवार दिला, तर बर्वे यांच्याकडून त्याला सहकार्य होईलच, याची शाश्‍वती नाही. नाही म्हणायला पक्षासोबत आहोत, पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करू, असे नेते नेहमीच सांगतात. पण, रामटेकच्या संदर्भात सुनील केदार ठरवतील, तीच दिशा बर्वे यांची असेल.

(Edited By - Akshay Sable)

R

rashmi barve
Chandrapur Lok Sabha Constituency : पक्षांतर्गत स्पर्धा प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसच्याही मार्गातील अडसर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com