Andhare gave the challenge to Devendra Fadnavis : घटनेने प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. लोक वेगवेगळ्या माध्यमातून सरकारच्या विरोधात व्यक्त होत आहेत. त्यांचा आवाज दाबला जात आहे. संविधान आणि देशाची लोकशाही वाचविण्याची ही शेवटची संधी आहे. विद्यमान सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास २०२४ ही शेवटची निवडणूक असेल, अशी भीती शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. (Then 2024 will be the last election)
चंद्रपुरातील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या बहुजन समता पर्व कार्यक्रमात अंधारे बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी कोमल खोब्रागडे, पोलिस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली, स्वागताध्यक्ष डॉ. दिलीप कांबळे, समन्वयक डॉ. संजय घाटे आदी उपस्थित होते. फुले, शाहू, आंबेडकरांनी चालवलेल्या चळवळीमुळे लोकांना व्यक्त होण्याचा अधिकार मिळाला आहे.
निवडणूक प्रचारात फुले, शाहू, आंबेडकर यांचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांवर प्रश्न विचारले तर कारवाई करायची, हे सयुक्तिक नाही. हिंमत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यावर यावे आणि फुले-शाहू -आंबेडकरांचे साहित्य जाळून दाखवावे, असे आव्हान अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना त्यांच्या घटनात्मक अधिकाराअंतर्गत सरकार मिळाले आहे. मात्र, सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे. अदानींनी जनतेचे २० हजार कोटी रुपये बुडवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतील तर मग काय झाले? हा पैसा जनतेच्या कष्टाचा पैसा आहे. लोकांनी घाम गाळून कमवलेला हा पैसा टॅक्स म्हणून दिला आहे. लोकांना त्याबद्दल प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. शिवचरित्राचे उमेदवार शेख सुभान अली यांनीही कार्यक्रमात आपले विचार मांडले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हते.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते. जे शिवाजी महाराजांसोबत निष्ठेने काम करत होते. दिवसेंदिवस शिवाजी महाराजांचे नाव घेऊन विशिष्ट पंथाच्या विरोधात चिथावणी दिली जात आहे, दंगली घडवल्या जात आहेत. समता पर्व कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रपूर आयडॉल स्पर्धेची दुसरी फेरी झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकथेवर आधारित नाटकाचेही प्रयोग करण्यात आले. व्यासपीठावर डॉ.दादा वासनिक, अशोक घोटकर, डॉ.इसादास भडके, डॉ.राजू शेंडे, डॉ. अमित धवस, डॉ. कपिल गेडाम, डॉ. सुनील मल्लोजवार उपस्थित होते. संचालन संगीता मानकर यांनी केले. प्रास्ताविक अनिल डहाके यांनी, तर आभार सूरज दहागावकर यांनी मानले.
अंधारे यांनी भाषणाच्या शेवटी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर कोटी करीत एकच हशा पिकवला. माझ्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तरीही मी अजिबात माफी मागणार नाही. माझा प्रत्येक शब्द तोलून-मोजून बोललेला आहे. शब्द बदलायला मी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नाही, असा टोला त्यांनी हाणला.
नाशिकच्या (Nasik) काळाराम मंदिरातील वेदोक्त मंत्र प्रकरणावरून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चंद्रपुरात (Chandrapur) खडे बोल सुनावले आहेत. राजघराण्यातील व्यक्तीसंदर्भात घडल्याने लगेच ब्राम्हणमुक्त मंदिराची हाक महाराष्ट्रभर देण्यात आली. मात्र एखाद्या दलिताच्या मंदिर प्रवेश मुद्द्यावर सोयीने मौन बाळगले जाते. ब्राह्मणमुक्तीची हाळी देणारे लोक सिलेक्टिव्ह राजकारण (Politics) करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.