Susha Andhare at Ramtek : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा काल (ता. १३) रामटेकमध्ये पोहोचली. तेथे उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टिका करत चौफेर फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सोडले नाही. (She did not spare Devendra Fadnavis either)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करताना देवेंद्र भाऊ, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. मग लगेच दुरुस्ती केल्यागत करत ‘हे देवेंद्र भाऊ नाहीत, हे देवेंद्र भाऊ तर बिच्चारे गोडबोले आहेत, (देवेंद्र गोडबोले शिवसेना-उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत) ते दुसरे देवेंद्र भाऊ...’ असे म्हणत फडणवीसांवर त्यांनी जोरदार टिका केली. खोटं बोल, पण रेटून बोल, असं त्यांचं काम आहे. कर्नाटकचे निकाल लागले. यातही ते आपलंच कसं खरं, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अंधारे म्हणाल्या.
जयस्वालांकडे होती कुबेराची खाण..
जयस्वालांना १९९९ मध्ये उमेदवारी दिली होती. त्यानंतर २००४ ते २००९ आणि २००९ ते २०१४ उमेदवारी दिली. ते आमदारही झाले. २०१४ ते २०१९ हा काळ सोडला तर ते २०१९मध्ये पुन्हा निवडून आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्याकडे सत्ता नव्हती, असं नाही. शिवसेनेने (Shivsena) त्यांना अनेक वेळा सत्ता दिली. पहिल्यांदा त्यांना जिल्हा परिषद (ZP) सदस्य बनवले. सगळ्यात कमी वयाचा आमदार म्हणून त्यांना संधी दिली. तीन वेळा आमदारकी दिली. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी खनिकर्म महामंडळ दिलं. हे महामंडळ म्हणजे कुबेराची खाण म्हटली पाहिजे.
फडणवीसांनी सांभाळून घेतले..
खनिकर्म महामंडळात त्यांनी खोऱ्यानं पैसा ओढला. पण पैसा किती आहे, यावर त्या माणसाचे वजन ठरत नाही. तर लोकांच्या मनात त्याचे काय स्थान आहे, त्यावर ठरते. वाळू घाटात जयस्वालांनी (Ashish Jaiswal) प्रचंड भ्रष्टाचार केला. अनेक वेळा चौकशीच्या मागण्या झाल्या. पण एकाही तक्रारीची चौकशी झाली नाही. सर्व चौकश्या जयस्वालांनी मॅनेज केल्या. त्यांना काहीच झाले नाही. कारण देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) त्यांना बऱ्यापैकी सांभाळून घेतले. म्हणून तर जयस्वाल गुवाहाटीला गेले, उगाच झाडी, डोंगर बघायला थोडी गेले, असा थेट आरोपही अंधारे यांनी केला.
रेतीचे ठेके कुणी तपासू नये, खनिकर्म महामंडळातील भ्रष्टाचार कुणी बाहेर काढू नये. प्रदूषण, कोल इंडस्ट्रीवर कुणी बोललं नाही पाहिजे. म्हणूनच ते गुवाहाटीला गेले, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.