Teachers Transfers : गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना सरकारने व्हॅलेंटाइन डे’चे दिले ‘हे’ बक्षीस !

Gondia ZP : अनेक वर्षांनी त्यांचे गृहजिल्ह्यात जाण्याचे स्वप्न झाले साकार, शंभराहून अधिक शिक्षकांना दिलासा.
Gondia ZP
Gondia ZPSarkarnama
Published on
Updated on

Teachers Transfers : गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आला. यामध्ये शंभराहून अधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया करून शिक्षकांना नवीन वर्षाची व्हॅलेंटाइन डेची भेट दिली. तर अनेक वर्षांनी शंभराहून अधिक शिक्षकांचे गृह जिल्ह्यात जाण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन 2017 पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. 21 जून 2023च्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात 24 जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते.

Gondia ZP
Gondia's Former Minister : गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या माजी मंत्रिमहोदयांना कशाची वाटतेय भीती?

आंदोलनात 10 हजार शिक्षकांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्य शासनाकडे सादर केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने कॅबिनेट मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन शिक्षक सहकार संघटनेला दिले होते.

दरम्यान 28 ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनांच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी राज्यातील बदलीपात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने तत्काळ सुरू करावी, अशी मागणी केली होती.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांचा समावेश करून तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात रुजू होणार आहेत. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील शंभराहून अधिक शिक्षकांना दिलासा मिळाला असून यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन तात्काळ कार्यवाही केली जात आहे. निवडणुकीच्या या मोसमात कुणीही नाराज राहू नये, याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. हे शिक्षक जेथेही बदलून जातील, तेथे आपले गुणगाण गातील, अशी अपेक्षा यंत्रणेला आहे. या निर्णयाने सरकारने शिक्षकांना खूष करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com