केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या शाखा म्हणून काम करताहेत…

भाजपवाल्यांनी (BJP) आपली कृत्ये तपासून बघावी. आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असेही कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) म्हणाले.
Pravin Kunte Patil On BJP
Pravin Kunte Patil On BJPSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : आपल्या देशात अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, तेथील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. या तपास यंत्रणा भाजपच्या शाखा असल्यासारख्या काम करत आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला.

कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) म्हणाले, देशवासीयांना आता माहिती पडले आहे की, केंद्र सरकारच्या (Central Government) सर्व तपास यंत्रणा मग ते सीबीआय, (CBI) एनआयए असो किंवा ईडी. (ED) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दावणीला बांधल्या गेल्या आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्या लोकांचा फर्जीवाडा जनतेसमोर आणला, तेव्हापासून वाटले होते की मलिक यांची राजकीय शिकार करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो केला. राहिला ईडीच्या विश्‍वसनीयतेचा प्रश्‍न, तर आपण गेल्या सात वर्षांमध्ये ईडीने केलेल्या कारवायांकडे लक्ष दिले पाहिजे.

मागील काळात कर्नाटक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, मंत्री छगन भुजबळ, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांना टारगेट केले गेले आहे. एक-एक करून निवडून भाजपच्या विरोधी पक्षातील लोकांना ईडीने टारगेट केले आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये गैरभाजप सरकार आहे, तेथील सरकार पाडण्यासाठी भाजपने सर्व केंद्रीय तपास यंत्रणांना कामी लावले आहे. त्या यंत्रणांवरदेखील भाजपने दबाव टाकल्याचे लक्षात येते आहे.

आमच्यावर कुठलेही आरोप करताना हे लक्षात घ्यावे लागेल की, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांना लोकसभेचे तिकीट देऊन खासदार बनवण्याचे काम भाजपने केले आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून आम्हाला नैतिकता शिकण्याची आवश्‍यकता नाही. आमच्यावर किंवा इतर कुणावरही आरोप करताना भाजपवाल्यांनी आपली कृत्ये तपासून बघावी. आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असेही कुंटे पाटील म्हणाले.

Pravin Kunte Patil On BJP
शेतकऱ्यांनी मोदी सरकारची चांगलीच जिरवली : प्रवीण कुंटे 

आता जनता सर्व समजून चुकली आहे. जेवढे प्रयत्न त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केले, तेवढीच महाविकास आघाडी मजबूत बनत केली आहे. आता तर ही आघाडी कुठल्याही परिस्थितीत तुटणे नाही. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर तर महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते अजून घट्टपणे एकत्रित आले आहेत. आता आक्रमकता काय असते, हे आम्ही दाखवून देणार. मलिक यांच्या समर्थनार्थ काल आम्ही मोठे आंदोलन केले, आज पुन्हा त्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत. या अन्यायाच्या विरोधात आता लढा तीव्र करणार असल्याचे प्रवीण कुंटे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com