Eknath Shinde News : वज्रमूठ सभेला जाताना भीषण अपघात; ठाकरे गटाच्या जखमी कार्यकर्त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री आले धावून

MVA rally In Nagpur : महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ सभेसाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते रवाना झाले होते.पण...
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Nagpur : छत्रपती संभाजीनगर यशस्वी सभेनंतर महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये होत आहे. त्यामुळे या सभेसाठी आघाडीच्या नेतेमंडळींनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या सभेकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच एक दु:खद घटना घडली. या सभेला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले होते.

मात्र, या कार्यकर्त्यांचा समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षभेद विसरुन अपघातातील ठाकरे गटाच्या जखमी कार्यकर्त्यांच्या मदतीला धावले.त्यांनी जखमी कार्यकर्त्यांवर तातडीनं उपचार करण्याचे आदेश डाॅक्टरांना दिले.

Eknath Shinde News
CM Eknath Shinde News: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आणखी एक पॅकेज; मुख्यमंत्री करणार घोषणा!

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा ही येत्या 16 एप्रिल रोजी नागपूरला होणार आहे. या वज्रमूठ सभेसाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले होते. पण समृद्धी महामार्गावर या कार्यकर्त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात दोन जण जागीच ठार झाले. तर काही कार्यकर्ते जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या तत्परता आणि मनाच्या मोठेपणावर परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Eknath Shinde News
Prakash Ambedkar News : प्रश्न सुटत नसतील तर आमदार-खासदारांना मारा ; प्रकाश आंबेडकरांचा अजब सल्ला ; म्हणाले..

सभेला अद्याप पोलिसांची परवानगी नाहीच...!

नागपूरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरुन स्थानिक राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीच्या सभा स्थळावरुन भाजप आमदार व काँग्रेस आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सभेला तीनच दिवस शिल्लक असताना अद्याप नंदनवन पोलीस परवानगी मिळालेली नाही. याचदरम्यान, आघाडीच्या सभेच्या मैदानावरुन स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दर्शन कॅालनी मैदान खेळासाठी आरक्षित असल्याने महाविकास आघाडीच्या सभेची परवानगी रद्द करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा 'हा' गंभीर आरोप...

संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेला मिळालेला प्रतिसाद बघता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनमत आता शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात होत असताना महाविकास आघाडीच्या विरोधात अपप्रचार सुरू करत मैदानावरुन विरोध केला जात आहे. अशा राजकीय विरोधाला आम्ही जुमानत नाही. हा केवळ राजकीय विरोध असल्याची टीका करत आघाडीची सभा ही दर्शन कॉलनीच्या मैदानावर होणार असल्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com