Cricketnama 2023 : सिद्दीकी पितापुत्र अन् मिर्झांच्या अष्टपैलू खेळीमुळे काँग्रेसकडून शिवसेना पराभूत!

Congress Wins against Shivsena : काँग्रेसच्या खेळाडूंची जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आलं कामाला
Baba Siddiqui
Baba SiddiquiSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena (UBT) Tigers Vs Congress Warriors : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : बाबा सिद्धीकी, आमदार झिशान सिद्दीकी, वझाहत मिर्झा यांच्या जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची जादू चालली अन् काँग्रेस विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या सामन्यात काँग्रेसनं ठाकरे गटावर 36 धावांनी विजय मिळविला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा तिसरा सामना टीम काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात झाला.

काँग्रेसची(Congress) टीम वझाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात मैदानात उतरली. सलामीला मिर्झा यांच्यासह सलमान मैदानावर उतरले. आशिष हाडगे यांनी संतुलित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सलमान यांनी षटकार व चौकार लगावले. मिर्झा आणि सलमान यांनी तुफन फटेबाजी करीत 3 षटकात धावसंख्या शून्य गडी 52 धावा केली. 53 धावा झाल्या असतानाच वझाहत मिर्झा बोल्ड झाले.

यानंतर झिशान सिद्धीकी मैदानात उतरले. मात्र त्यानंतर लगेचच सलमान धावबाद झाले. झिशान यांचे वडिल बाबा सिद्दीकी हे यानंतर मैदानावर आले. परंतु त्यानंतर झिशान झेलबाद झाले. इरफान शेख यांनी तीन विकेट घेतल्या. तोवर स्कोअर 3 गडी बाद 60 असा झाला होता.

विनित तोडय आणि बाबा सिद्धीकी यांनी चौकार, षटकार लगावले मात्र ते झेलबाद झाले. नीलेश मुन यांच्या खात्यात ही विकेट गेली. विनित यांच्यानंतर मैदानावर आलेल्या अमीर शेख यांनी काही धाव केल्याने, 4.5 षटकांत काँग्रेसची धावसंख्या 4 गडी बाद 75 अशी झाली. वझाहत मिर्झा आणि बाबा सिद्दीकी यांना काँग्रेसच्या समर्थकांनी यावेळी ‘चिअरअप’ केले.

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट)(Shivsena) फलंदाजांपैकी आशिष हाडगे, नितीन तिवारी सलामीला आलेत. मारवान कादरी यांचे चेंडू त्यांनी चांगलेच टोलवले. चौकार, षटकार आणि वाइड यामुळं शिवसेनेने पहिल्याच षटकात जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी नितीन तिवारी त्रिफळाचित झाले. त्यानंतर शिवसेनेचे इरफान शेख मैदानात उतरले होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14 धावा अशी शिवसेनेची स्थिती होती.

विनित तोडकर यांनी दुसरं षटक टाकलं. त्यावेळी वझाहत मिर्झा यांनी आशिष हाडगे यांना ‘स्टम्पआऊट’ केलं. तिसऱ्या पंचांनी ‘रिव्ह्यू’ पाहिल्यानंतर त्यांना बाद घोषित केले. आशिष यांनी 5 चेंडूत 13 धावा काढल्या. त्यानंतर लगचेच अमित यांचा झेल घेत मिर्झा यांनी त्यांना शून्यावर तंबुत परतविले. दोन षटकांच्या अखेरीस ठाकरे गटाची धावसंख्या 3 गडी बाद 16 होती.

तिसरं षटक टाकताना झिशान सिद्धीकी यांचे चेंडू ठाकरे गटाच्या खेळाडूंनी टोलविण्याचा प्रयत्न केला. परंतु सलग दोनदा झिशान यांचे वडिल बाबा सिद्धीकी यांनी ‘डाइव्ह’ मारत तीन धावा रोखल्या. त्यामुळं तीन षटकांच्या अखेरील 3 बाद 20 अशी ठाकरे गटाची धावसंख्या झाली. त्यानंतर वझाहत मिर्झा यांनी आणखी एक गडी बाद केला. त्यानंतर नीलेश मुन मैदानावर आले. त्यांनी येताच काही फटके हाणले. त्यावेळी 8 चेंडूत 43 धावा ठाकरे गटाला विजयासाठी हव्या होत्या.

अखेरचं षटक बाबा सिद्दीकी यांनी टाकलं. त्यांनी इरफान शेख यांची विकेट घेतली त्यानंतर दुसरा बळीही घेतला. 5 गडी बाद 39 धावांवर ठाकरे गटाचा डाव आटोपला. काँग्रेसनं 36 धावांनी सामना जिंकला.

‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यांच्या हस्ते यावेळी बाबा सिद्धीकी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वझाहत मिर्झा यांना सामनाविराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com