नागपूर : नागपूर (Nagpur) शहर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड नुकतीच झाली. पण यामध्ये निवडल्या गेलेल्या उमेदवाराच्या वयाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. विजयी आणि पराभूत उमेदवारांचे समर्थक वेगवेगळे दावे करीत आहेत. त्यामुळे हा वाद आता दिल्ली पोहोचला आहे.
सर्वाधिक मते मिळाल्याने तौसिफ खान याची युवक काँग्रेसच्या (Youth Congress) शहराध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा त्याच्या समर्थकांनी केला आहे. दुसरीकडे ४१ वर्षांचा उमेदवार युवक काँग्रेसचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी दिल्लीत (Delhi) धाव घेतली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा वाद चांगलाच चिघळणार असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. युवक काँग्रेसच्या निवडणूक नियमानुसार सर्वाधिक मते घेणाऱ्या उमेदवाराची अध्यक्षपदाची नियुक्ती केली जाते. याशिवाय युवक काँग्रेसच्या अध्यक्षाची वयोमर्यादा ३५ अशी ठेवण्यात आली आहे.
तौसिफ खान याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडली असल्याने त्याचा अर्ज होल्डवर ठेवण्यात आला होता. याशिवाय रौनक चौधरी, वसीम खान, अक्षय घाटोळे यांचेही अर्ज काही तांत्रिक कारणास्तव राखून ठेवले होते. निवडणुकीच्या निकालात तौसिफ यास सर्वाधिक २५ हजार ९३५ मते पडली. त्या खालोखाल चौधरी १२ हजार ३००, वसीम खान १२ हजार ८०० आणि अक्षय घाटोळे यास ९ हजार ९६ मते मिळाली तसेच शिलज पांडेय यास ६ हजार मते मिळाली.
तौसिफच्या वयाचा दाखला दिल्लीत..
सर्वाधिक मते घेणारे तीनही उमेदवारांचे अर्ज होल्डवर ठेवण्यात आले होते. ते निवडणूक लढण्यास पात्र नव्हते. त्यामुळे तौसिफ खानची अध्यक्षपदी नियुक्ती होऊच शकत नाही, असे पांडे समर्थकांचे म्हणणे आहे. याविरोधात दिल्लीत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याच्या वयाचा दाखला देणारे पुरावेसुद्धा सादर करण्यात आल्याचे समजते. तौसिफ समर्थक दिशाभूल करीत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे.
पराभवामुळे विरोधकांचे आरोप..
सर्वाधिक मते मिळाल्याने तौसिफ खान हाच शहराध्यक्ष पदाचा दावेदार आहे. त्याचा अर्ज होल्डवर ठेवण्यात आला होता हे खरे आहे. मात्र ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष म्हणून तौसिफ खानचे नाव जाहीर करण्यात आले. विरोधकांच्या आरोपाला काही अर्थ नाही, असे त्याच्या समर्थकांचा म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.