नागपूर : सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना केवळ सामंजस्याचा अभाव असला की काय होते, हे अधोरेखित करणारी घटना नागपुरात काल पहाटे घडली. एका नामांकित खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरने विषारी औषध टोचून घेऊन आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळलो असल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात म्हटले आहे.
डॉ. अभिजित रत्नाकर धामणकर (वय ३८ रा. गिरीबालाजीनगर, हुडकेश्वर) असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव असून ते नागपूर (Nagpur) शहरातील खाजगी रुग्णालयात (Hospital) प्रॅक्टिस करीत होते. शुक्रवारी नाइट शिफ्टला अभिजित ड्युटीवर गेले होते. रात्री रुग्णालयात नाइट राऊंड झाल्यानंतर डॉक्टरांच्या कक्षात आराम करायला गेले. पहाटे इमर्जन्सी पेशंट रुग्णालयात आल्यानंतर सिस्टर डॉक्टरांना (Doctor) उठवायला गेली असता, अभिजित खाली पडलेले आढळले. याची सूचना वरिष्ठ डॉक्टरांना देऊन डॉ. अभिजित यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र आधीच विषारी इंजेक्शनचा हेवी डोज घेऊन अभिजित यांनी आपली जीवनयात्रा संपविली होती. अभिजित यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्यात त्यांनी पारिवारिक कारणांनी त्रस्त झाल्याचे नमूद केले आहे. सासरकडील मंडळीच्या जाचाला त्रासून आत्महत्या (Suicide) करीत असल्याचा उल्लेख आहे.
पहिल्या पत्नी पासून विभक्त झाल्यानंतर डॉ. अभिजित यांनी दुसरे लग्न केले. मात्र सासरच्या मंडळीची परिवारात ढवळाढवळ वाढल्याने पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण झाला होता. धामणकर यांना १ वर्षाचा मुलगा आहे. त्यालादेखील भेटू दिलं जात नसल्याने गेले काही दिवस अभिजित तणावात होते आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. इतरांच्या जीवनासाठी आटापिटा करणाऱ्या डॉक्टरचा अशा पद्धतीने अंत होणे, हे विवाह संस्थेसाठी खर तर चिंतेचा विषय आहे. त्यामुळे उच्च शिक्षण असणेच पुरे नसून पारिवारिक सामंजस्यदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे, हे या निमित्याने अधोरेखित झाले आहे.
ते सेंट्रल एव्हेन्युवरील किमया हॉस्पिटल येथे कार्यरत होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका रुग्णाची तब्येत बिघडल्याने परिचारिका अभिजित यांना उठविण्यास गेल्या असत्या डॉ. अभिजित खाली पडलेले दिसले. त्यांनी ही माहिती इतर डॉक्टरांना माहिती दिली. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा श्वास आणि नाडी बंद पडल्याने याची माहिती संचालकांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार डॉ.अभिजित यांना काही वेळ व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. याची माहिती गणेशपेठ पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. अभिजित यांच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये सासरच्या मंडळीवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान प्राथमिक तपासणीत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.