Gadchiroli Crime : महागावात क्रोर्याची परिसीमा; परिवारातील पाच जणांच्या मृत्यूचे कारण उलगडले

Police News : एका नवविवाहितेने सासरकडील महिला नातेवाइकाची साथ घेत पाच जणांवर विषप्रयोग केला.
Gadchiroli Crime
Gadchiroli CrimeSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli News : प्रेमविवाह केला म्हणून मुलीचे आईवडील तिव्र संतापले होते. मुलीच्या या निर्णयाने तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर सासरकडील कुटुंबीयांकडून वारंवार टोमणे मिळत असल्याने प्रेमविवाह केलेल्या एका नवविवाहितेने सासरकडीलच महिला नातेवाइकाची साथ घेत पाच जणांवर विषप्रयोग केला, अन् त्यांचे जीव घेतले. क्रोर्याची परिसीमा गाठणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील महागावातील या महाभयानक घटनेचा यशश्वी तपास करून बुधवारी गडचिरोली पोलिसांनी (Police) आरोपींना अटक केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महागाव येथील शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपुरात (Nagpur) उपचारादरम्यान विजया कुंभारेचा मृत्यू झाला. यानंतर चोवीस तासांतच शंकर कुंभारे यांचादेखली मृत्यू झाला. एकाच वेळी अचानकपणे दोघांचाही मृत्यू झाल्याने गावात विविध शंकांना पेव फुटले. या दुःख घटनेतून सावरण्याच्या आत शंकर कुंभारे यांची मुलगी कोमल दहागावकर, मुलगा रोशन कुंभारे व त्यांची मेहुणी वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडली. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण सात दिवसांत या तिघांचाही मृत्यू झाला.

Gadchiroli Crime
Ahmednagar BJP: भाजपची नगर शहर कार्यकारिणी जाहीर; विखे गटाला झुकते माप

एकाच परिवारातील पाच जणांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात विविध शंकांना पेव फुटले होते. दरम्यान, शंकर कुंभारे यांचा दिल्लीस्थित असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा वडिलांची तब्येत बघण्याकरिता चंद्रपूर (Chandrapur) येथे आला होता. तो दिल्लीला गेल्यावर त्यांचीही तब्बेत बिघडली. शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना रुग्णालयात घेऊन जाणारा वाहनचालक राकेश मडावी याचीही तब्बेत बिघडली. शंकर कुंभारे यांच्या सालीच्या मुलगाही अत्यवस्थ झाला. हा सारा घटनाक्रम लक्षात घेता, यामागे मोठ गौडबंगाल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात तपासाला सुरुवात करण्यात आला. यासाठी पोलिसांची चार पथक तयार करण्यात आली. कुंभारे कुटुंबातील सून संघमित्रा हिच्यावर पाळत ठेवण्यात आली. पोलिसांनी तेलंगणात जाऊन तपासाची चक्रे फिरविली. यानंतर या गुन्ह्यात संघमित्रा कुंभारे व शंकर कुंभारे यांच्या साल्याची पत्नी रोझा रामटेके यांचा सहभाग असल्याचे निदर्शनात येताच पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता, आपणच हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली. रोझा रामटेके हिने तेलंगणातून विष आणले होते व संघमित्रा कुंभारे पाण्यात व जेवणातून हे विष दिले असल्याचे समोर आले. संघमित्राने रोशनसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, तिच्या आईवडिलांनी या निर्णयाचा विरोध केला. शेवटी संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर कुंभारे कुटंबीयांकडून माहेरच्या मुद्द्याला घेत संघमित्राला टोमणे मारले जायचे. याचा तिला राग आला होता.

शंकर कुंभारे यांची मेहुणी रोझा रामटेके हिचा जागेच्या हिश्श्यावरून कुंभारे कुटुंबीयासोबत वाद होता. यामुळे संघमित्रा व रोझा या दोघांनीही मिळून आपल्याच कुटुंबातील पाच लोकांचे जीव घेतले. ही बाब जेव्हा पोलिसांनी समोर आणली तेव्हा संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके या दोघींनाही अटक केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Gadchiroli Crime
Lalit Patil drugs case : 'महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा ड्रगमाफिया ललित पाटीलला आशीर्वाद होता ?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com