Sandeep Dhurve : भाजप आमदाराचा 'चांदी के डाल पर...' डान्स; तेही गौतमी पाटीलच्या पुढ्यात

Sandeep Dhurve Dance With Gautami Patil : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना भाजप आमदार डाॅ. संदीप धुर्वे नाचगाण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली.
Sandeep Dhurve
Sandeep Dhurve Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहीहंडी महोत्सवात आयोजन केलं होते. सध्या यवतमाळ जिल्ह्यासह उमरखेडमध्ये भयावह पूरस्थिती आहे.

अशातच या दहीहंडी उत्सवात आर्णी-केळापूर मतदारसंघातील भाजप आमदार डाॅ. संदीप धुर्वे नृत्यागंणा गौतमी पाटील हिच्या पुढ्यात नाच-गाण्यात गुंग असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. आमदार संदीप धुर्वे अशा भयावह पूरस्थितीत एका नृत्यांगणाच्या पुढ्यात नाच-गाण्यात गुंग कसे होऊ शकतात, अशी टीका विरोधकांकडून आता होऊ लागली आहे.

भाजप (BJP) आमदार नामदेव सासाने आणि समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेडमध्ये दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. या महोत्सवासाठी नृत्यागंणा गौतमी पाटील हिचा डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कुठलाही कसूर भाजप ठेवला नव्हता. भव्य-दिव्यता होती. गौतमी पाटील येणार म्हटल्यावर कार्यक्रमाला युवकांची मोठी गर्दी होती.

Sandeep Dhurve
Katol Assembly Election: डझनभर इच्छुक! पण अजितदादांच्या मनात दुसराच उमेदवार? 'विजयगड'वर खलबतं

नृत्यागंणा गौतमी पाटील हिने काही गाण्यांवर ठेका धरला. या कार्यक्रमाला भाजप आमदार डाॅ. संदीप धुर्वे देखील आले होते. त्यांनी देखील 'चांदी के डार पर, सोने का मोर...' या गाण्यावर गौतमी पाटील हिच्या पुढ्यातच ठेका धरला. आमदार धुर्वे पिळदार मिशीवर ताव मारत गौतमी पाटीलबरोबर गाण्यावर एकत्र ठेका धरला. आमदार धुर्वे यांनी गौतमीबरोबर केलेल्या डान्समुळे युवकांनी एकच कल्ला केला. आमदार धुर्वे यांच्या या कृतीवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.

Sandeep Dhurve
Bacchu Kadu : नवनीत राणांचा पराभव कुणामुळे झाला अन् रवी राणा कुणामुळे पडणार? बच्चू कडूंनी सांगितलं; शेरोशायरीतून केलं घायाळ

यवतमाळ जिल्ह्यासह उमरखेडमध्ये भयावह पूरस्थिती असताना आमदार धुर्वे यांनी नाच-गाण्यात गुंग आहे. विशेष म्हणजे, ते गौतमी पाटील हिच्या पुढ्यात नाचत आहे, अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे. आमदार धुर्वे आणि गौतमी पाटील हिच्या नाचण्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे.

पवारांनी जनसन्मान यात्रा केली रद्द

दरम्यान, तीन दिवसांपासून यवतमाळ, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुफान पाऊस होत आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. शेती पिकांचे नुकसान झाले. व्यापारी पेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुकानदारांचे नुकसान झाले. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखा हा पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुसद इथली त्यांची जनसन्मान यात्रा रद्द केली. मात्र भाजप नेत्यांनी, अशा भयावह पूरस्थितीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com