Maharashtra Politics : तेव्हा फक्त एकनाथ शिंदेच होते, ज्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला...

Nagpur to Goa : नागपूर ते गोवा असा नवा मार्ग विकसित करण्याचा संकल्प यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सोडला.
Devendra Fadanvis and Eknath Shinde
Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama

समृद्धी महामार्गासोबत आता बुलेट ट्रेन, गॅस लाइन आणि पेट्रोलियमची पाईप लाइनसुद्धा येणार आहे. या मार्गावर झालेला ५० हजार कोटी रुपयांचा खर्च दोनच वर्षांत वसूल होणार असल्याचे सांगून हे विकासाचे नवे मॉडेल असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. यापुढे नागपूर ते गोवा असा नवा मार्ग विकसित करण्याचा संकल्प यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सोडला.

नागपूर (Nagpur) -मुंबई (Mumbai) समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली तेव्हा माझे तत्कालीन सहकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला आणि म्हणाले की, चांगला प्रकल्प आहे, करुया आपण… आणि त्यानंतर कामाला लागलो. या कामात अनेक अडचणी आल्या, नव्हे निर्माण केल्या गेल्या. पण आम्ही एक-एक करून अडचणीवर मात करत गेलो. परिणामस्वरूप आपण आज हा सोहळा येथे साजरा करतो आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रियेत शेतकऱ्यांना भडकावण्यात येत होते. पण आम्ही शेतकऱ्यांचा विश्‍वास जिंकला, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

समृद्धी महामार्गाचे उद्‍घाटन पंतप्रधानांच्या हस्ते, व्हावे अशी आपली इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. आता नागपूर ते गोवा असा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. नागपूर विमानतळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास केला जाणार आहे. मेट्रो टप्पा २ आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलनाचे प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच पाठविले होते. मात्र आघाडी सरकारने त्यातील साध्या त्रुटीसुद्धा दूर केल्या नाहीत. राज्यात आपले सरकार येताच तत्काळ त्यास मान्यता मिळाली. हा डबल इंजीन सरकारच्या फायदा असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

गेल्या २० वर्षांपासून हे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंमत दिली म्हणून समृद्धी महामार्ग करू शकलो. यासाठी लोकप्रतिनिधी, सर्व संपादकांना एकत्रित केले आणि मग या कामाची सुरुवात केली. भूमी अधिग्रहण मोठी प्रक्रिया होती. एमएमआरडीए, एमआयडीसीला सांगितले की, सर्व पैसा मुंबईत कमवून मुंबईतच नका लावू. विदर्भ मराठवाड्यातही द्या. ९ महिन्यात ७०० किलोमीटरच्या जमिनीचे अधिग्रहण केले. एकनाथ शिंदेंनी स्वतः सह्या केल्या. कारण तेव्हा त्यांचे लोक विरोध करीत होते. जमीन देऊ नका, असे शेतकऱ्यांना सांगितले जात होते. पण १५ दिवसांत त्या गावांतील जमिनी लोकांनी आम्हाला दिल्या. एक मॉडेल तयार केले. एमएसआरडीसी ला ५० हजार कोटीचे प्लॉट दिले. सर्व बॅंकांना बोलावले. सर्वप्रथम स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ८ हजार कोटी दिले. ५० हजार कोटीचा रस्ता तयार झाला. येणाऱ्या दोन वर्षात ५० हजार कोटी रुपये मिळतील, असे मॉडेल तयार केले आहे.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
Fadanvis : फडणवीस म्हणाले, शिंदे गटाचे खासदार अमित शहांना नेहमीच भेटतात...

पंतप्रधान मोदींनी भारताला गतीशक्ती योजना दिला आहे. जी जगातील सर्वाधिक मजबूत योजना आहे. ती भारताचे चित्र बदलणार आहे. गतीशक्तीचे एक उदाहरण हा महामार्ग आहे. मल्टी युटीलीटी कॉरीडोअर तयार केला आहे. गॅस पाइपलाइनचे काम ८० टक्के झाले आहे. सीएनजी सर्व जिल्ह्यांत पोहोचेल. अंडर सी केबल या माध्यमातून आणून डेटा सेंटर तयार करणार आहोत. सोलरची व्यवस्था केली आहे. मोदींनी दिलेल्या योजनेने मोठा विकास झाला आहे. मोदी आणि गडकरींनी मोठे गिफ्ट महाराष्ट्राला दिले आहे. रेल्वे स्टेशन सुंदर झाले आहे. एक वर्षात नागपूर विमानतळाच्या उद्घाटनासाठी मोदींना पुन्हा बोलावणार आहोत. मोपलवार, प्रवीण परदेशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com