प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे श्रीमंत मराठ्याचे सरकार, गरीब मराठ्यांची वाट लावली...

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) उगीच लुडबूड करू नये आणि आम्ही ओबीसींच्या बाजुने आहोत, हे दाखविण्याचे नाटक करू नये, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Sarkarnama

Published on
Updated on

भंडारा : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने लुडबुड करून ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविले. आता राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reervation) विषयात लुडबुड करू नये, असे खडे बोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सुनावले.

भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात लुडबुड करत ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविले आहे. सुप्रीम कोर्टाचे ओबीसी निवडणुकीबाबत स्पष्ट निकाल असताना ज्याप्रमाणे श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांची वाट लावली, तशी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात लुडबुड करत ओबीसीचे राजकीय आरक्षण घालवून त्यांचीही वाट लावली आहे.

निवडणुका कधी घ्यायच्या आणि कधी नाही, हा न्यायालयाचा निर्णय स्पष्ट आहे. २७ टक्के आरक्षणाच्या जागांवरती उमेदवार आलेले नाही, त्यांच कार्यक्रम जाहिर करा. दोघांचाही ज्यामध्ये कार्यक्रम जाहिर झाला आणि ज्यांचा कार्यक्रम जाहिर झाला नाही. त्यांचं मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी झाला पाहिजे. न्यायालयाच्या या निकालावर महाराष्ट्र सरकारने उगीच लुडबूड करू नये आणि आम्ही ओबीसींच्या बाजुने आहोत, हे दाखविण्याचे नाटक करू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कारण हे श्रीमंत मराठ्यांचे सरकार आहे. त्यांनी गरीब मराठ्यांची आधीच वाट लावली आहे आणि आता ते ओबीसींची वाट लावायला निघाले आहेत. राजकीय आरक्षण गेल्यानंतर आता शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण तरी वाचले पाहिजे, असे वाटत असेल तर ओबीसी जनतेने भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षांना मतदान करू नये. तेव्हाच कुठे ओबीसींचे आरक्षण वाचू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Prakash Ambedkar</p></div>
प्रकाश आंबेडकरांचा पहिला वार भाजपवर! ओबीसींना सांगितली 'मन की बात'...

महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात लुडबुड करत ओबीसीचे राजकीय आरक्षण घालविल्याच्या खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षनात लुड़बुड करू नये, आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत, हे दाखवू नये अशी कानउघाडनी आंबेडकर यांनी येथे केली आहे. महाविकास आघाड़ीचे सरकार श्रीमंत मराठ्याचे सरकार असल्याच्या स्पोटक आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP leader Arun Lakhani after being elected unopposed from the Chandrapur-Wardha-Gadchiroli Local Authorities Constituency, with discussions focusing on Banti Bhangdia’s political strategy.
BJP
Model Code of Conduct
Viplav Bajoria
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com