pravin ashtikar
pravin ashtikarsarkarnama

अमरावतीत राजकारण तापले; आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे.

अमरावती : अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin ashtikar) यांच्या अंगावर शाईफेकून निषेध व्यक्त केला. शाईफेक करणारे कार्यकर्ते आमदार रवी राणा (ravi rana) समर्थक असल्याची चर्चा आहे.

आज (ता. ९) महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारून त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली. काही कळायच्या आत हा प्रकार झाल्याने आयुक्त आष्टीकरही गोंधळून गेले. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. या प्रकारामुळे अमरावतीमध्ये पुन्हा एकाद राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

pravin ashtikar
सोमय्या म्हणतात, पुणे पोलीस आयुक्तांना हटवा

प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांसोबत कचऱ्याची पाहणी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. मोकळी जागा असल्याने या ठिकाणी दोन महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचे लक्षात आल्याने आष्टीकर सतर्क झाले. त्यांनी तेथून बाजूला जाण्याचा प्रयत्न केला.

आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच महिलेने त्यांना घेरले आणि बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर फेकली. सुरक्षकांनी तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. महिलांनी फेकलेल्या शाईमुळे आयुक्त शाईने पूर्णपणे माखून गेले. आयुक्तांचा पांढराशुभ्र ड्रेस निळा झाला होता. सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना गाडीत बसवले. त्यानंतर आयुक्त आपल्या घरी गेले. मात्र, या प्रकारामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

pravin ashtikar
बिकिनी, घुंघट किंवा हिजाब...हा महिलांचा अधिकार; प्रियांका गांधींची वादात उडी

दरम्यान, आमदार राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलिस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी राणा यांनी केली होती. मात्र, कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्याने तो पालिकेने काढला. त्यावरून राजकारण तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com