सोमय्या म्हणतात, पुणे पोलीस आयुक्तांना हटवा

पुण्यातील (Pune) जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Ssomaiya) केला होता. या गोंधळानंतर शिवसेना आणि भाजपमधील (BJP) वाद अधिकच टोकाला गेला आहे,
Shivsena -BJP
Shivsena -BJP
Published on
Updated on

मुंबई : 'मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. माझ्यात नशा आहे ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची, माझ्यात नशा आहे उद्धव ठाकरेंच्या माफियागीरीला संपवण्याची, माझ्यात नशा आहे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लुटणाऱ्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे आणण्याची, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर इशारा दिला आहे. माझा इंग्रजी पत्राला विरोध नाही पण माफियासेनेचे लोक जे सोशल मीडियावर कुणकुण करत आहेत त्यांच्यासाठी , असे म्हणत किरीट सोमय्यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर करत शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) पुण्यात आले होते. ते पुणे महापालिकेत आले असताना तिथे जमलेल्या शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत ते पायऱ्यांवर पडले. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी ते पुण्यात आले होते. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गोंधळानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद अधिकच टोकाला गेला आहे, शिवसेना आणि भाजपनेत्यांच्या एकमेकांवर कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आज पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Shivsena -BJP
'हा खेळ देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला': मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

पुण्यात सीआयएसएफचे सिनिअर कमांडो आले होते. पण मी जेव्हा पुणे पालिकेत गेलो तेव्हा तेथे एकही पोलीस नव्हता. किरीट सोमय्यांचे हातपाय तोडा, असे आदेशच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना देण्यात आले होते. त्याचमुळे तेथे त्यांनी एकही पोलीस पाठवला नाही. अमिताभ गुप्ता निपक्ष चौकशी करू शकत नाही. अमिताभ गुप्तांना तात्काळ पुण्यातून हटवा, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनीच जम्बो कोविड सेंटरचे 58 कोटींचे कंत्राट सुजित पाटकर यांना दिले. सुजित पाटकर याने एक नाही तर अशी सात कंत्राटे मिळवली आहेत. याची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली

Shivsena -BJP
माझं सांगणं फडणवीसांना चांगलंच कळतंय; राऊतांचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित कंपनीला काम न देण्याचे आदेश दिले होते. पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे त्याच कंपनीला काम दिले. ही कंपनी संजय राऊत यांच्या मित्र सुजीत पाटकर यांच्या मालकीची आहेत. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला. कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने काळी कामे केली. हा सुजित पाटकर संजय राऊत याचा पार्टनर आहे. प्रवीण राऊतला अटक झाली म्हणून बोंबलत आहेत. चौकशी होणार म्हणून संजय राऊत यांना भिती वाटत आहे, असा चिमटाही काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com