नागपूर ः जनतेला माहिती आहे की, या दोन्ही मेट्रोचे काम मी सुरू केले होते आणि ते पुढेही गेले होते. या सरकारमध्ये ते रखडले, पण आज ते सुरू होत आहे. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा. मेट्रो-३ चा प्रश्न निकाली काढा, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
मुंबईत आज मेट्रोचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होत आहे. याचे निमंत्रण विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना आहे. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाही. याबद्दल विचारले असताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जरूर उद्घाटन करावं. पण राज्यातील लोकांना माहिती आहे की, या दोन्ही मेट्रोचं काम मी सुरू केलं होतं. पुढे या सरकारच्या काळात ते रखडलं होतं. पण आज मेट्रो सुरू होत आहे. याचे श्रेय सरकारने घ्यावं, पण अपश्रेयाचे भागीदार होऊ नये.
मेट्रो-३ चे काम रखडले आहे. ही मेट्रो आतापर्यंत सुरू व्हायला पाहिजे होती, पण आता पुढे चार वर्ष सुरू होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. सरकारने मेट्रो-३ चा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. ही मेट्रो कुलाब्यापासून ते सिप्सपर्यंत आहे. ही ४० किलोमीटरची लाइन आहे. ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. पण कारशेड न मिळाल्यामुळे पुढची चार वर्ष ही सुरू होऊ शकत नाही. आरेचं कारशेड सुरू केलं, तर केवळ ९ महिन्यांत ही लाइन सुरू होऊ शकते. त्यामुळे हा प्रयत्नदेखील सरकारने करावा. अन्यथा मेट्रो-२ चं श्रेय घेता-घेता मेट्रो-३ चं अपश्रेयदेखील त्यांना घ्यावं लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
म्हणून आजचा गुढीपाडवा वेगळा..
हे नवीन वर्ष आपल्या देशाला, प्रगतीच्या नवीन शिखरावर पोहोचवेल, ही अपेक्षा आहे. या गुढीपाडव्याचं वेगळेपण असं आहे की, एकीकडे प्रभू श्रीरामांची मिरवणूक आम्ही काढत आहोत आणि अयोध्येमध्ये प्रत्यक्ष रामललाच्या मंदिराचं निर्माण वेगाने होत आहे. त्यामुळे येत्या काळातला एखादा नव्या वर्षाचा दिवस अयोध्येलादेखील साजरा करता येईल, हे आज खात्रीलायकरीत्या सांगता येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.