Gondia : शेतकऱ्यांवर अस्मानी, सुलतानी आणि हत्तींचंही संकट

Elephant Nuisance : गोंदिया जिल्ह्यात हत्तींचा धुडगूस, प्रशासकीय अधिकारी व नेत्यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव
Elephant in Gondia.
Elephant in Gondia.Sarkarnama
Published on
Updated on

Farmers in Trouble : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं संकटात असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत आता हत्तींच्या उपद्रवामुळं भर पडलीय. त्यामुळं पुन्हा एकदा नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी करण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू झालीय.

दररोज या हत्तींकडून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या हत्तींमुळे गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आता लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. गोंदिया जिल्ह्याला अन्य राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या भागातील जंगलांमधून हे हत्ती जिल्ह्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Elephant in Gondia.
Gondia News : नवेगांवबांध ग्रामपंचायतीने पुकारला ग्रामविस्तार अधिकाऱ्याविरोधात एल्गार

गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धानाचं हत्तींमुळे प्रचंड नुकसान होत आहे. हरभरा, तूर, वटाणा, मूग आदी पिकांनाही हत्ती पायदळी तुडवत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंदिकापुरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी केली. विधानसभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. हत्तींच्या उपद्रवाबाबत त्यांनी तारांकित प्रश्नही उपस्थित केला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर हत्ती दिसत आहेत. तालुक्यातील बोळदे, राजोली, भरणोली आणि नवेगावबांध क्षेत्रात विस्तीर्ण जंगल आहे. त्यामुळं या भागात जास्त नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक भागांमध्ये हत्ती शिरत असल्यानं ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण आहे. हत्तींमुळे शेतीचं नुकसान होत असल्याचं शेतकरी मनसाराम ताराम यांनी ‘सरकारनामा’शी बोलाताना सांगितलं. हरभरा, वटाणा, मूग आणि इतर पिकांची या हत्तींनी नासधूस केलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हत्तींचा उपद्रव जिल्ह्यात सुरू असताना वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनातील एकही अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकेला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ग्रामस्थांमध्येही त्यामुळं भीती असल्याचं सांता स्वसंकर या महिलेनं सांगितलं. गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर हत्ती गोंदियात शिरले होते. त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर नासधूस केली होती. यंदाही हाच त्रास होत आहे. त्यामुळं नुकसानीची आकडेवारी वाढत चालली आहे.

गोंदियासोबतच पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये डिसेंबर 2022 मध्ये हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. ओडिशातून हे हत्ती स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळं गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आहे. हत्तींच्या मुद्द्यावरून या भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली आहेत. आता पुन्हा पश्चिम बंगालमधील हे रानटी हत्ती गोंदियात दिसत आहेत. हत्ती समूहाने येत असल्याने ग्रामस्थही त्यांच्यापासून दूर पळत आहेत. हत्तींपासून संरक्षणासाठी पूर्व विदर्भातील काही भागात कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्यात गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोहफुलांच्या वासामुळं हत्ती गावांकडं येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. गावांच्या वेशीवर पथदिवे लावण्यात यावेत, गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेकोट्या पेटत्या ठेवाव्या, मिरची पावडरचा धूर करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. हत्तींचं येणं-जाणं सुरू असताना त्यांच्या समूहापासून दूर राहण्याची सूचनाही ग्रामस्थांना करण्यात आली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Elephant in Gondia.
Gondia : भास्कर जाधव आले आणि आघाडीत बिघाडी लावून गेले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com