Tumsar Crime News : गोबरवाही रेल्वे फाटकावर थरार, वाळू तस्कराचा गोळ्या झाडून खून !

Firing at Tumsar : अज्ञात आरोपींनी बंदुकीतून सिराजवर गोळ्या झाडल्या.
Firing at Tumsar
Firing at TumsarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara District Tumsar Crime News : ‘मोक्का’ लागलेल्या एका सराईत गुन्हेगारावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ आज (ता. २५) सायंकाळच्या सुमारास घडली. ((Unknown accused shot Siraj with a gun)

नईम सिराज शेख खान, असे खून झालेल्याचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात आरोपींनी बंदुकीतून सिराजवर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर मुख्य आरोपी फरार असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा खून वर्चस्वाच्या जुन्या वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. बॅटरी व्यावसायिक आणि नंतर वाळू तस्करांचा मोरक्या झालेला मोक्काच्या आरोपी विरोधी टोळीने आज ‘गेम’ केला.

सायंकाळच्या सुमारास गोबरवाही रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे वाहने तेथे थांबली हाेती. त्यामध्ये मृतक नईम खान व त्याचा एक साथीदार त्याच्या चारचाकी वाहनामध्ये बसला होता. दरम्यान, पाठीमागून सिनेस्टाइल दुचाकीने आलेल्या चार अज्ञात आरोपींनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात नईम खान व त्याचा एक साथीदार, असे दोघे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर गाडीत बसलेला एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी घटनास्थळ गाठले. तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.

मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका गँगवारसाठी कुप्रसिद्ध आहे. या अगोदरही तुमसरात बरेचदा बंदुकीतून गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने हत्या झालेल्या आहेत. यात पुन्हा एका हत्याकांडाची भर आज पडली. आजच्या या थरारानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Edited By : Atul Mehere

Firing at Tumsar
Bhandara Grampanchayat : पतीचा घरकुलाचा मोह पत्नीला नडला; सदस्य पदावरून व्हावे लागले पाय उतार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com