Bhandara Grampanchayat : पतीचा घरकुलाचा मोह पत्नीला नडला; सदस्य पदावरून व्हावे लागले पाय उतार!

Grampanchayat Mahila Member : एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेळा घरकुलाचा लाभ घेता येत नाही
Gram Panchayat
Gram PanchayatSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Political News : केंद्र सरकारने महिलांना राजकीय आरक्षण देत पदावर बसवले असले तरी अनेक ठिकाणी त्यांचे पतीच कारभार हाकताना दिसतात. पत्नीचा पदाचा गैरफायदा घेत पतीने घरकूल मंजूर करून घेतले. पतीचा हा घरकुलाचा मोह ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पत्नीला भोवला आहे. पतीने घरकुलाचा दोनदा लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्याने भंडारा जिल्ह्यातील खुटसावरीच्या महिला सदस्य संगीता विजय बोरकर यांना अपात्र करण्यात आले आहे. तसे आदेशच भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. (Latest Political News)

एकाच व्यक्तीच्या नावाने दोनदा घरकुलाचा लाभ घेता येत नाही. मात्र खुटसावरी ग्रामपंचायतीच्या सदस्य संगीता बोरकर यांचे पती विजय बोरकर यांच्या नावाने दोन घरकूल मंजूर झाले होते. त्यामुळे बोरकर यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र करण्यात यावे, अशी तक्रार भंडारा जिल्हाधिकारी यांना अर्जदार महेंद्र बाबूराव तिरपुडे यांनी केली होती. (Maharashtra Political News)

Gram Panchayat
Yerawada Central Jail : काय सांगता! येरवडा कारागृह प्रशासनाला चक्क कैद्यानेच 'असा' घातला २७ लाखांचा गंडा...

तक्रारीत संगीता विजय बोरकर यांचे पती विजय देवराम बोरकर यांनी २०११-१२ मध्ये राजीव गांधी निवारा योजना व त्यानंतर २०१९-२० मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे नमूद होते. दरम्यान, कालातरांने याबाबात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांचा अहवाल, सदस्य संगीता बोरकर यांनी दाखल केलेले लेखी युक्तिवाद व प्रकरणासह असलेले दस्तऐवज आदींचे अवलोकन केले.

काय आहे नियम

जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ग) पंचायतीच्या कोणत्याही सेवेत स्वतःचा किंवा आपल्या भागीदारीमार्फत कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भाग किंवा हितसंबंध असेल, असे व्यक्ती अपात्र ठरते. या नियमानुसार ग्रामपंचायत सदस्य संगीता बोरकर यांच्या पतीने दोनदा घरकुलाचा लाभ घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे संगीता बोरकर यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केला.

(Edited by Sunil Dhumal)

Gram Panchayat
Maratha Reservation News : "...म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज !" ; 'या' नेत्याचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com