
BJP Amravati latest news : महायुतीमधील युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीला शड्डू ठोकणार तुषार भारतीय यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. रवी राणाविरोधात थेट विधानसभा निवडणूक उतरले. आता विधानसभा निवडणुकीला वर्ष होत आलं आहे. पुला खालून बरचं पाणी गेलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. त्यामुळे भाजपने जुळवाजुळव करत, गणित आखण्यात सुरूवात केली आहे. यातच आमदार रवी राणा यांना विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारे अमरावतीमधील तत्कालीन जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये एन्ट्री देण्यात आली आहे.
अमरावती महापालिकेचे सभागृह नेते, भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा वापसी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी केली होती. त्यामुळे तुषार भारतीय यांचं भाजपमधून निलंबन झालं होते. तुषार भारतीय यांना मुंबईत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तुषार भारतीय यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाची डोकेदुखी वाढू शकते, असे जाणकारांचे निरीक्षण आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू असून ते पुन्हा भाजपमध्ये परतल्याने आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
बडनेरा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत आमदार रवी राणा हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभे होते. पण, निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. गेल्या चार दशकांपासून पक्षाचे कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही आणि उपऱ्यांना सन्मानाचे स्थान मिळते, अशी खंत तुषार भारतीय यांनी व्यक्त करीत बंडाचा झेंडा उंचावला आहे.
तुषार भारतीय बंडखोरीनंतर निवडणुकीत उतरले होते. त्यावेळी त्यांनी प्रचारासाठी खास रणनीती वारली होती. प्रचार पत्रकावर ‘निष्ठावान भारतीय जनता पक्ष’, असा उल्लेख करत लक्ष वेधून घेतले होते. हीच ती वेळ संघटन मजबूत करण्याची. आपला माणूस निवडून आणण्याची, असा नारा त्यांनी दिले. अशा नाऱ्याचे पत्रक बडनेर विधानसभा मतदारसंघात सर्वत्र पाठवण्यात आली होती.
या पत्रकावर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर यांची छायाचित्रे वापरली होती. तुषार भारतीय यांची ही प्रचार रणनीती रवी राणांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.