Gram Panchyat Election : भाजपचे रणजित पाटील यांच्या घरातीलच दोघे परस्परांविरुद्ध मैदानात

Enthusiasm in Campaign : अकोल्याच्या घुगंशीत होणार प्रतिष्ठेची तिहेरी लढत
Gram Panchyat Election in Akola
Gram Panchyat Election in AkolaGoogle
Published on
Updated on

Political Battle in Akola : भाजप नेते तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या घुंगशी गावात ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डॉ. रणजित पाटील यांच्या घरातीलच दोन सदस्यच परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. त्यामुळं काका विरुद्ध पुतण्या असा सामना घुगंशी गावात रंगणार आहे. या दोन्ही पॅनेलच्या विरोधात संजय देशमुख यांचंही पॅनेल रिंगणात उतरले आहे. त्यामुळं गावातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व तिहेरी होणार आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व ३८ ग्रामपंचायतींची पोट निवडणूक होत आहे. रविवारी (ता. ५) मतदान आणि सोमवारी (ता. ६) मतमोजणी होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्यानं ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला आहे. अशातच माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या गावातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनत चालली आहे. (Two members of BJP's Ranjit Patil's house against each other in the Akola Gram Panchayat election)

डॉ. रणजित पाटील यांचे काका अनिल पवित्रकार पाटील आणि चुलत भाऊ राहुल पाटील हे दोघे परस्परांविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. पाटील यांच्या या दोन पॅनेलच्या विरोधात प्रा. संजय देशमुख हे स्वतः सरपंच पदासाठी मैदानात आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतच्या निवडणुकीतील लढत तिहेरी होणार आहे. अशात पाटील यांच्या घरातीलच दोन सदस्यांमध्ये तुंबळ लढत होणार असल्यानं घुंगशी गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रा. संजय देशमुख आहेत कोण?

माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील व्ही. एन. पाटील आणि प्रा. संजय देशमुख या दोघांचेही घुंगशी गावांत दोन वेगवेगळी महाविद्यालयं आहेत. डॉ. रणजित पाटील हे गृहराज्यमंत्री असताना २०१७ मध्ये व्ही. एन. पाटील यांचा देशमुख यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून संजय देशमुख हे विठ्ठल पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील पॅनेलचा संजय देशमुख यांच्या पॅनेलने पराभव केला होता. यावर्षी स्वतः देशमुख हे गावातील निवडणुकीत सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. आता घुंगशी गावात कोणाची सरशी होते, याकडं ग्रामस्थांसह जिल्ह्यातील सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

यापूर्वी बसला होता धक्का

यापूर्वी २०१८ मध्ये घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने जोरदार मुसंडी मारत सरपंचपदासह सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवित पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या होम ग्राउंडवर जोरदार धक्का दिला होता. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील आणि याच तालुक्यातील घुंगशी अकोल्यापासून सुमारे ४३ किलोमीटरवर आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

Gram Panchyat Election in Akola
Prakash Ambedkar in Akola : ''नेत्यांची परिस्थिती अशी झाली आहे की,....'' प्रकाश आंबेडकरांचं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com