Uday Samant On Thackeray: आता अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा, उदय सामंतांचे उद्धव ठाकरेंना आव्हान !

Ajit Pawar News: एकनाथ शिंदेंच्या काळात अनेक महत्त्वाची कामे होत आहेत.
Uday Samant, Uddhav Thackeray and Ajit Pawar
Uday Samant, Uddhav Thackeray and Ajit PawarSarkarnama

Bhandara District Political News : भंडारा जिल्ह्यातील उद्योगांचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. आता अजित पवार यांना गद्दार म्हणून दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी ठाकरेंना दिले आहे. (Many important works are being done during Eknath Shinde's time)

काल (ता. १०) जळगाव येथे उद्धव ठाकरे यांनी खोकेवाल्यांना खोक्यात गाडा, असे वक्तव्य केले होते. त्यावर उदय सामंतांनी त्याच भाषेत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत म्हणाले की, आम्हाला गद्दार म्हणता, मग अजित पवारसुद्धा आपला पक्ष फोडून आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना तुम्ही गद्दार म्हणून दाखवा.

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) कामे होत नव्हती. म्हणून आम्ही बाहेर पडलो, असेही सामंत म्हणाले. मात्र, आता एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) काळात अनेक महत्त्वाची कामे होत आहेत, असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारची पाठराखण त्यांनी केली. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आल्यावर त्यांनी योजनांचा पाऊस पाडला आहे.

भंडारा जिल्ह्यात सतत होणारी मागणी लक्षात घेता कॉपर क्लस्टर, ब्राँझ क्लस्टरची ५० हेक्टरवर उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण मागणी मान्य केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजकांसाठी रेल्वेच रॅक स्टेशन नव्हते. तुमसर येथे रेल्वेच रॅक स्टेशन व्हावे, यासाठी रेल्वे विभागाला मंजुरीकरिता पत्र पाठवून लवकरच रॅक स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या रॅक स्टेशनला लागणारा पैसा हा एमआयडीसीच्या माध्यमातून देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. आता जिल्ह्यातील उद्योगांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे मंत्री सामंत यांच्या घोषणांवरून दिसून आले.

Edited By : Atul Mehere

Uday Samant, Uddhav Thackeray and Ajit Pawar
Bhandara-Gondia News : ‘सारस’ करणार अवैध धंद्यांची पोलखोल, मुनगंटीवारांच्या ट्विटनंतर सुरू झाली चर्चा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com