Uddhav Thackeray Amravati Speech: भाजपचा अजेंडा म्हणजे, ' भ्रष्ट तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा'

Uddhav Thackeray Vidarbha Daura: स्वत:च ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायंच वाकून हे तुमचं हिंदूत्व
Uddhav Thackeray Amravati Speech
Uddhav Thackeray Amravati SpeechSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Sabha: संत रामदास स्वामी म्हणायचे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. पण आज भष्ट्र तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा, असा भाजपचा एक अजेंडा झाला आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे दोनदिवासांच्या विदर्भ दौऱ्यावरआहे. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, या भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांना आत्मविश्वास नाही. आपण मोठे झालो, सत्ताधीश झालो तरीही आपण निवडून येऊ की नाही, याची धाकधूक त्यांना आहे. त्यामुळे समोर कुणाला ठेवायचंच नाही. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर करायचा. पोलिसांमार्फत नोटीसा पाठवायच्या. अरे मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा जरा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.

Uddhav Thackeray Amravati Speech
Uddhav Thackeray on Opposition Meeting: विरोधी पक्षांची एकता कशासाठी ? उद्धव ठाकरे म्हणाले...

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्यावरुन भाजपने रान उठवलं आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. जर कोविड काळातला मुंबई महापालिकेचा घोटाळा काढायचं असेल तर राज्यातील प्रत्येक महापालिकेचा कोविड काळातील घोटाळा काढायचा असेल तर राज्यातला आणि प्रत्येक महापालिकेतील घोटाळा शोधा. यासोबतच पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा, असं खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे.

म्हणजे स्वत:च ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायंच वाकून हे तुमचं हिंदूत्व. महाराणा प्रताप यांच्यासारखा वीर खुलेआम लढला. जो वीर असेल त्याने बोलायचं, पण पण चोर, लुटेरु आणि नामर्दांची लायकी नाही गर्व से कहो हम हिंदू हे असं म्हणायची. मुंह मे राम और बगल मे छुरी हे आमचं हिंदुत्व नाही. मुंह मे राम और हाताला ताण हे आमचं हिंदुत्त्व आहे. आम्ही भाजजपकडून हिंदुत्त्व शिकलो नाही, अशी सणसणीत टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com