Uddhav Thackeray Vidarbha Daura: ही विरोधी पक्षांची एकता मानत नाही, ही देशप्रेमींची एकता आहे. लोकशाही प्रेमींची एकता, स्वातंत्र्य प्रेमींची एकता मानतो. अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. ते अमरावतीत बोलत होते. उद्धव ठाकरे दोन दिवासांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोन आठवड्यांपूर्वी पटना येथे विरोधी पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. केंद्रातील भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी देशभरातील जवळपास ११ विरोधी पक्ष या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेतेमंडळीही उपस्थित होती. या विरोधी पक्षांच्या आघाडीवर भाजपने अनेकदा टिकाही केली. त्यांच्या या टिकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य आंदनात मिळालं नाही. आपल्या देशाने दिडशे वर्षे इंग्रजांची गुलामगिरी भोगली, हजारो क्रांतीकारकांनी यासाठी बलिदान दिलं आहे.त्यानंतर आपली भारतमाता या गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाली, याला स्वातंत्र्य म्हणतात, हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देशप्रेमी एकत्र येत असतील तर तुम्ही त्याला विरोधी एकता बोलू शकत नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमुद केलं.
मी मुख्यमंत्री होण्याचं माझ स्वप्न नव्हतं, शिवसेनाचा मुख्यमंत्री करण्याचं वचन मी माझ्या वडिलांना दिल होतं. ते आजही कायम आहे. हेच मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सांगितलं होत आणि त्यावेळी त्यांनी ते मान्यही केलं होत. देशाचं स्वातंत्र्य टिकण्यासाठी,आणीबाणी नंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा देण्यात आली म्हणून त्यांचं सरकार परत आलं. पण आज तेवढीही मुभा आहे की नाही, तेही माहिती नाही.
पावसाळ्यानंतर निवडणुकांचा धडाका सुरु होईल. या निवडणुकांच्या पार्श्वभूी वर मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. पण मी सभांसाठी नव्हे,तर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. जे लढण्यासाठी माझ्यासोबत उभे आहेत त्या माझ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. पूर्वी राजकारणात आधी पक्ष फोडले होते. आता पक्ष चोरायला लागले आहेत. त्या पक्षांवर दावा करण्यास सुरुवात झाली आहे, हे अगदी चूकीचे आहे. माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी पक्षाला शिवसेना हे नाव दिलं होतं. ते पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्याला देणार नाही. माझ्या पक्षाचं नाव ते बदलू शकत नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.