Uddhav Thackeray's orders : उद्धव ठाकरेंनी सैनिकांना दिले संजय राठोड आणि भावना गवळींना धडा शिकवण्याचे आदेश !

A political lesson : राजकीय धडा शिकवण्याचे आवाहन ठाकरेंनी आपल्या सैनिकांना केले.
Sanjay Rathod, Uddhav Thackeray and Bhavana Gawali
Sanjay Rathod, Uddhav Thackeray and Bhavana GawaliSarkarnama

Yavatmal - Washim Constituency News : यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी आणि दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी दिलेला दगा उद्धव ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या दोघांनाही धडा शिकवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. (He has planned to teach both of them a lesson)

उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २४) मुंबईत वर्धा आणि यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघाचा आढावा तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघांचीही माहिती घेतली. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांचे हात सळसळत आहेत. सर्व गद्दारांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी ठाकरेंना आजच्या आढावा सभेत दिली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांनी घेतली. आपल्याला आघाडीमध्ये निवडणुका लढवायच्या आहेत. त्यादृष्टीने आपली तयारी करा, जर विधानसभा किंवा लोकसभा मतदार संघात आपण जागा मागताना आपली तयारी असायला पाहिजे, असे ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

जर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घ्यायचा असेल तर त्याठिकाणी आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, आपला उमेदवार दिला तर निवडून येऊ शकतो का, याविषयी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविकास आघाडीमध्ये आपण मतदार संघावर दावा करत असताना त्या मतदारसंघात आपली ताकद वाढवा, स्थानिक पातळीवरील संघटना मजबूत करा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Sanjay Rathod, Uddhav Thackeray and Bhavana Gawali
Uddhav Thackeray On BJP : 'मी भाजपशी 'पॅचअप' करू शकलो असतो पण..' ; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान !

आगामी लोकसभा निवडणुकीत भावना गवळी आणि विधानसभेत संजय राठोड या गद्दारांना राजकीय धडा शिकवण्याचे आवाहन ठाकरेंनी आपल्या सैनिकांना केले. या दोघांच्याही विरोधात लढण्यासाठी आपले जुने सहकारी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना रिंगणात उतरवण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यासाठी त्यांनी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीचा दौराही केला.

संजय राठोडांना (Sanjay Rathod) धोबी पछाड द्यायची असेल तर त्यांच्या समाजाची लोक जवळ करावी लागतील, हे ठाकरेंनी हेरले आणि त्यादृष्टीने पावेल टाकण्यास सुरुवात केली. दिग्रस येथे झालेल्या सभेत त्यांनी दणकेबाज भाषण ठोकून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील लोकांना आपलेसे केले आणि गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) ही खेळी कितपत यशस्वी होते, हे येणारा काळच सांगणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com