Uddhav Thackeray CM Post : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे भविष्यात महाविकास आघाडीलाही सोडतील;भाजप नेत्याची भविष्यवाणी

Chandrashekhar Bawankule's Prediction : काँग्रेस-राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत, त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले नाही, असे उद्धव ठाकरे भविष्यात म्हणतील,
Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 23 August : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे आता हातापाया पडत आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडले, तेच उद्धव ठाकरे भविष्यात महाविकास आघाडीलाही सोडतील, अशी भविष्यवाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे. त्याबाबत बावनकुळे यांनी सांगितले, महाविकास आघाडील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदासाठी (Chief Ministership) हात जोडत आहेत. शरद पवारसुद्धा (Sharad Pawar) उद्धव ठाकरे यांना कंटाळले आहेत.

भविष्यात शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतील, काँग्रेसने दिल्लीतून ठाकरे यांना परतवून लावले आहे. खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दाखवा असे म्हणत आहेत. पण, काँग्रेस-राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत. मागील वेळी झाले ते झाले, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांना आता सुप्रिया सुळे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपला सोडले. तेच उद्धव ठाकरे भविष्यात महाविकास आघाडीलाही सोडतील, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी त्यांना सुरक्षा दिली आहे. मागील काही काळात मराठा आंदोलकांना अनेक नेत्यांना रस्त्यात अडवले आहे, त्यामुळे ही केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी संयम राखावा; पवारांच्या भेटीनंतर भाजप नेत्याचा सबुरीचा सल्ला

राज्य सरकारने साखर कारखान्यांच्या दिलेल्या थकहमीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याबाबत बावनकुळे म्हणाले, उच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे, हे मला माहीत नाही. कारखाने टिकेल तरच शेतकरी टिकतील. कर्जाचे हमी देऊन कारखाने जिवंत करण्यासाठी सरकारने हमी घेतली होती.

बदलापूर अत्याचाराची घटना निषेधार्थ आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. सरकारने लक्षात आल्यानंतर आरती सिंग सारखे अधिकारी नेमले आहेत. पण, महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करत आहेत, विकृत मानसिकतेवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule-Uddhav Thackeray
NCP News : '...म्हणून अजित पवार यांच्याकडे राज्याचं गृहखातं द्यावं!'; शरद पवार गटातील 'या' महिला नेत्याची सर्वात मोठी मागणी

आपल्या तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. हिंगणघाटमध्ये मुलीला जाळून टाकले. नांदेड, पुणे, साकीनका अनेक घटना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या आहेत. स्वतःच न बघता महाराष्ट्र पेटवण्याचं काम सध्या सुरू आहे. मणिपूरसारखं महाराष्ट्र होईल, असे शरद पवार म्हणत होते. महाविकास आघाडीचे मनसुबे हे बदलापूर घटनेला धरून मणिपूर करायचे दिसतं, अशी शंका चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com