BJP News: भाजपनं विदर्भात डाव साधला; शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड

Vidarbha Politics : विधानसभेच्या निवडणुकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या त्या प्रमुख दावेदार होत्या. सुनील केदार यांनी त्यांच्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. लोकसभेच्या निवडणुकीत केदार आणि आमदार मेघे यांच्या चांगलेच बिनसले होते.
BJP Vs NCP Sharad Pawar
BJP Vs NCP Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस'मुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडणार आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघातील नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती उज्ज्वला बोढारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सुमारे दीडशे ते दोनशे पदाधिकारी भाजपात दाखल होणार आहेत.

यात माजी नगरसेवक, ग्राम पंचायत सदस्य, दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. यामुळे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार आहे. हा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी सकाळी नऊ वाजता सर्वांचा प्रवेश समारंभ आयोजित केला आहगे. यावेळी हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. उज्ज्वला बोढारे दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आल्या आहेत. हिंगणा विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.

BJP Vs NCP Sharad Pawar
ED raids Malegaon : बांगलादेशींना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वाटपप्रकरणी 'ईडी'ची मोठी कारवाई; नऊ ठिकाणी छापेमारी, अनेक अधिकारी रडारवर

विधानसभेच्या निवडणुकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख दावेदार होत्या. सुनील केदार यांनी त्यांच्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. लोकसभेच्या निवडणुकीत केदार आणि आमदार मेघे यांच्या चांगलेच बिनसले होते.

रामटेक लोकसभा मतदरसंघातून महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे निवडूण आल्यानंतर केदारांनी पहिली विजयी सभा हिंगण्यात घेतली होती. यात त्यांनी मेघे यांचा पराभव करायचा आहे अशी घोषणा केली होती सोबतच मेघे यांना खुले चॅलेंज केले होते.

महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांची पहिली पसंती उज्ज्वला बोढारे होत्या. मात्र रमेश बंग ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना डावलने शरद पवार यांना जमले नाही. त्यांनी शेवटच्या क्षणी बंग यांनाच उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही केदारांनी आपला हट्ट सोडला नाही.

BJP Vs NCP Sharad Pawar
Jaykumar Gore : जयकुमार गोरे हे सर्वांत चतूर मंत्री; ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी काढला चिमटा

बंग यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे बोढारे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता आमदार मेघे यांच्या विरोधात लढण्याची तयारी करणाऱ्या बोढारे स्वतःच भाजपात दाखल होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com