Nitin Gadkari News: नितीन गडकरींना होती काँग्रेसची ऑफर; खुद्द गडकरींनीच मोठा खुलासा करत सांगितला 'तो' किस्सा

Nitin Gadkari on Congress: "एक वेळ मी विहिरीत उडी मारेन, मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही"
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
Published on
Updated on

Political News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका बड्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, असा मोठा खुलासा खुद्द नितीन गडकरी यांनी केला आहे. मात्र, ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता, असं गडकरींनी सांगितलं आहे.

गडकरींनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, "एका मोठ्या नेत्याने मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफरच दिली होती. तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं, "एक वेळ मी विहिरीत उडी मारेन, मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही", असं गडकरींनी सांगितलं. ते शुक्रवारी भंडारा येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

Nitin Gadkari
Shrikant Shinde : कोरोना काळात घरात बसणारे नाही तर कामं करणारे आम्ही होतो; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, "गेल्या नऊ वर्षात भाजप सरकारच्या काळाच देशाने मोठी प्रगती केली. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या काळाच्या तुलनेत जी कामं झाली, त्या तुलनेत मागील नऊ वर्षात दुप्पट कामं झाली आहेत. मी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो. तेव्हा तेथील लोकांना 2024 च्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते अमेरिकेसारखे असतील असं सांगितलं होतं", असंही गडकरी म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकारने काय-काय कामं केली. त्या चांगल्या कामांची यादीच यावेळी सांगितली. याचवेळी बोलताना गडकरींनी जेव्हा राजकारणाची सुरवात केली होती त्या वेळचा एक किस्सा सांगितला.

Nitin Gadkari
Sharad Pawar on Jalgaon: अमळनेर येथे पोहचताच पवारांना म्हशी खरेदीची अन् जावा मोटारसायकलीची आठवण

गडकरी म्हणाले, "काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकर यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली होती. ते म्हणाले होते की, तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात. जर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. पण मी त्यांना त्यावेळी म्हणालो होतो, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापेक्षा मी विहिरीत उडी मारणं पसंत करीन", असा किस्सा सांगत गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, "भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास असून मी भाजपसाठी काम करतो", असंही यावेळी नितीन गडकरींनी सांगितलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com