Shrikant Shinde : कोरोना काळात घरात बसणारे नाही तर कामं करणारे आम्ही होतो; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shivsena : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.
Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

श्रीकांत शिंदे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना माहित नव्हतं हे सरकार बननार आहे की नाही. पण आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांबरोबर युती केली. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हिंदूहृदयसम्राट करू शकले नाहीत, तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे केलं. त्यांनी किती लाचारी केली. आम्ही जे केलं ते बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं", असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

Shrikant Shinde
Nitin Gadkari News: नितीन गडकरींना होती काँग्रेसची ऑफर; खुद्द गडकरींनीच मोठा खुलासा करत सांगितला 'तो' किस्सा

"मंबुईमधील अनेक नगरसेवक शिवसेनेत येत आहेत. ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत येत असून अजूनही काहींना यायचं आहे. ते नगरसेवकांना सांभाळू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. आम्ही जनतेत जाऊन काम करत आहोत. कोरोनाच्या काळात घरात बसणारे नाही तर दौरे करणारे आम्ही होतो", असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला.

"एकनाथ शिंदे एक दिवस हेलीकॉप्टरने गावाकडे गेले तर लगेच बातम्या झाल्या, आमच्यावर टीका झाली. पण ते मुख्यमंत्री आहेत म्हणून हेलीकॉप्टरने गावाकडे गेले. आधिच्या मुख्यमंत्र्यांकडे खूप वेळ होता म्हणून ते गाडी चालवत पंढरपूरला गेले. मात्र, आत्ताचे मुख्यमंत्री एक-एक क्षण जनतेच्या कामासाठी देत आहेत. मुख्यमंत्री तळागाळापर्यंत जाऊन जनतेची कामं करत आहेत. घरी बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये", असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर घणाघात केला.

Shrikant Shinde
Praful Patel on Ajit pawar : 'माझे अन॒ शरद पवारांचे संबंध किती गहन आहेत, हे कळायला अजितदादांना अनेक वर्षे लागतील'

"महाविकास आघाडीतील गोष्टी पटल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांना तेव्हा माहित नव्हतं हे सरकार बननार आहे की नाही. त्यावेळी जे आमदार शिंदे साहेबांबरोबर गेले, त्यांनाही माहिती नव्हतं. पण तरी देखील ते त्यावेळी असणारं सरकार सोडून शिंदे साहेबांबरोबर गेले", असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "शिव्याशाप, थुंकण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचे काम काही लोकांनी केले. सेक्युरिटी पाहिजे म्हणून त्याच लोकांनी बनाव केला. नाटक यायचं "काळू बाळूचा तमाशा" तसं आहे हे. अरे सेक्युरिटी हवी होती तर मुख्यमंत्री यांना फोन करायचा. पाठी पुढे एक गाडी दिली असती", असा टोला श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना लगावला.

Shrikant Shinde
Ajit Pawar On krishna-bhima stabilization: फडणवीसांच्या आरोपावर अजित पवारांनी थेट इतिहासच सांगितला...

"एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी सर्वात आधी प्रतापगडावरील कबरीचे अनधिकृत बांधकाम पाडलं. मात्र, हेच आधीच्या सरकारने पाडलं नाही. आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांबरोबर युती केली. पण खोके खोके म्हणून आम्हाला काही लोक हिनवत आहेत. मला वाटतं की, झोपेत देखील बरळत असतील. आम्हाला खोके खोके म्हणताय ना, पण विकास कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करत आहोत", असं म्हणत विरोधकांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com