Crop Loss News : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे पीक गेले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अजुनही पंचनामे आणि मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यासह विदर्भात देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. पंचनामे करण्यासाठी शेतकरी अधिकाऱ्यांची वाट पाहत आहेत. त्याच यवतमाळमधील बाभूळगावजवळली घारफल येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले.
अधिकारी येताच वाजंत्रीच्या गजरात चक्क ढोला ताशा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांची शेतशिवारात वरात देखील काढण्यात आली. सोयाबीनचे पीक सोंगणीला आले. कपाशी पिकेसुद्धा बोंडाने बहरले असताना अतिवृष्टीने तडाखा दिला. पावसामुळे उभे पीक पिवळे पडले. येवढे नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
फक्त पंचनामे नको शेतकऱ्यांना थेट मदत द्या, तातडीने पॅकेज जाहीर करा, अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. घारफळ शेतशिवारातील बाभूळगाव तालुका कृषी अधिकारी कृतिका डेरे, कृषी पर्यवेक्षक गोपाल जाधव व कृषी सहाय्यक दत्ता चेडके आदींनी नुकसानीची पाहणी केली.
सरकारने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानासाठी मदत जाहीर केली आहे. जिरायत पिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आठ हजार 500 तर, बागायत पिकांसाठी 22 हजार 500 प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. तसेच जमी खरडून गेल्यास प्रति हेक्टर 47 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.