यवतमाळ : उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) सध्या धर्मांतराचा (Conversion) मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-terrorism squad) आणखी एकाला अटक केली आहे. धीरज जगताप (Dheeraj Jagtap) असे या तरुणाचे नाव आहे. धीरज जगताप महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राहणारा असून दहशतवादी विरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून (Kanpur) त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात अवैधरित्या धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात 20 जून २०२१ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात देशभरातून 14 जणांना अटक करण्यात आली आहे. मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दिकी सोबत महाराष्ट्राचा रामेश्वर कावडे आणि कौशर आलम या प्रमुख आरोपींना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असताना धीरज जगतापच नाव समोर आलं. धीरजने दहा वर्षांपूर्वी धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला. तेव्हापासून तो अवैधरित्या धर्मांतरण करण्याचे काम होते. तसेच, तो धीरज प्रसाद कांवरे, कौसर आलम आणि अरसलान यांच्या संपर्कात होता. धीरज आणि इतर आरोपी अवैधरित्या धर्मांतराचा रॅकेट देशभरात चालवत होते. त्यासाठी त्यांनी DAWAH, REVER आणि REHAB या नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनवले होते. या व्हॉट्सअप ग्रुप द्वारे इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणे आणि प्रलोभने देऊन लोकांना इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडले जायचे. धीरज सुद्धा या रॅकेटचा एक महत्त्वाचा सदस्य होता. प्रकाश कावरे हा धर्मांतराच्या कायदेशीर कामे करायचा. अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.