Fake OBC Voter's : तायवाडे यांच्या भूमिकेमुळे आता बोगस आदिवासी आणि खरे आदिवासी नवा वाद

Babanrao Taywade Politics : नांदेड येथे सकल मराठा ओबीसी समाजाची एक सभा झाली. ज्यात मतदारांनी बोगस ओबीसी उमेदवाराला मतदान करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra elections
Maharashtra electionssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ‘बोगस ओबीसींना मतदान करू नका’ असे आवाहन केले आहे.

  2. हैदराबाद गॅझेटवर आधारित जीआरमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  3. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘खरे आणि बोगस ओबीसी कोण?’ या नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

Nagpur News : महायुती सररकारच्या हैदराबाद गॅझेटवर आधारित जीआरमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी घेतली होती. पण आता त्यांनी बोगस ओबीसीना मतदान करू नका असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे खरे आणि बोगस ओबीसी कोण? असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्राध्यापक मनोहरराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नांदेड येथे सकल मराठा ओबीसी समाजाची एक सभा झाली. यात मतदारांनी बोगस ओबीसीला मतदान करू नये, ओरिजनल ओबीसीना मतदान करावे तसेच सर्वच राजकीय पक्षांनी बोगस ओबीसीला उमेदवारी देऊ नये असा ठराव करण्यात आला. या मताशी तायवाडे यांनी सहमती दर्शवताना एकाद्या व्यक्तीने ओबीसीचे बोगस प्रमाणपत्र मिळवले असेल तर जात पडताळणी समितीकडे तक्रार करावी. माहिती अधिकारी कायद्याचा वापर करून वैधता तपासावी.

एखाद्याने चुकीचा डेटा देऊन ओबीसीचे प्रमाणपत्र मिळवले असेल तर ते रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. हे काम स्थानिकांना करावे लागणार आहे. तो व्यक्ती ओबीसी आहे की नाही हे बाहेरचे लोक सांगू शकत नाही. मात्र हे करताना कोणाला टार्गेट करू नये, भ्रम निर्माण करू नये, असे आवाहनही तायवाडे यांनी केले.

Maharashtra elections
तब्बल 12 मागण्या मान्य, ओबीसींचे उपोषण अखेर मागे, Babanrao Taywade, Atul Save, Nagpur News |

मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या विरोधात तायवाडे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून ओबीसी समाजासाठी अनेक आदेश काढून घेतले आहेत. अलीकडेच मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आंदोलनामुळे सरकार दाबावात येऊन त्यांच्या मागण्या मान्य करतील असे सांगून त्यांना नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू केले होते.

जरांगे यांची हैदराबादच्या गॅझेटमध्ये मराठा-कुणबी अशी नोंद असलेल्‍यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. ती सरकारने मान्य केली आहे. त्यातील ‘पात्र' हा उल्लेखही काढून टाकला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. छगन भुजबाळ, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके यांना या जीआरला विरोध दर्शवला आहे.

या विरोधात आंदोलनही केले जात आहे. या जीआरमुळे ओबीसीचे नुकासान होणार नाही असे मत बबनराव तायवाडे यांनी मांडले आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या त्यांच्यावर रोष आहे. वडेट्टीवार यांनी तायवाडे यांची भूमिका बदलली, ते सरकारकडे झुकले असल्याचा आरोपही केला आहे.

Maharashtra elections
‘...तेव्हा आम्ही मराठ्यांच्या विरोधात कोर्टात जावू’ तायवाडेंची भूमिका, Babanrao Taywade, Jarange |

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com