Assembly Election : तेलंगणातील प्रचारात मराठी पाऊल पडतेय पुढे

Polling in Telangana : सीमावर्ती गावांत तेलुगु भाषेचा वापर टाळताहेत राजकीय पक्ष
Election in Telangana
Election in TelanganaGoogle

Battle for the Legislative Assembly : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. यात तेलंगणा राज्याचाही समावेश आहे. तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी जोमानं प्रचार सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्ष ‘फ्रंटफूट’वर येत प्रचार करीत आहत. गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगुड्डा प्रकल्प हा तेलंगणातील प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलाय. प्रकल्पातील भ्रष्टाचारावरून काँग्रेस आणि भाजपनं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समितीला चांगलच घेरलंय. अशात तेलंगणातील प्रचारासाठी चंद्रपूर, गडचिरोलीतील सीमावर्ती भागांत तेलुगु नव्हे तर मराठी भाषेचा वापर केला जातोय.

भाषेवरून सीमावादाचा प्रश्न कायम असताना तेलंगणात प्रचारासाठी मराठीच्या वापराला जास्त प्राधान्य दिलं जातय. तेलुगु मातृभाषा असलेल्या तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात तर हा प्रचार चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. त्यामुळं तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये प्रचार करण्यासाठी मराठी भाषिक लोकांची मागणी चांगलीच वाढलीय. (Use of Marathi language increased over Telugu in Telangana Assembly Election Campaigning)

तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मराठी भाषा बऱ्यापैकी बोलली जाते. तेलंगणातील नागरिकांना मराठी भाषा लिहिता, वाचता येत नसली तरी बोलता येते व मराठीत काय बोललं ते कळतही. त्याचाच फायदा सर्वच राजकीय पक्षांनी घेण्यास सुरुवात केलीय. सीमावर्ती गावांमध्ये प्रचार करताना तेलुगु भाषेचा वापर करण्याऐवजी मराठीच्या वापरावर भर दिला जातोय. उमेदवारांचा प्रचार थेट मराठी भाषेतून सुरू आहे. सीमेवर असलेल्या तेलंगणातील शिरपूर शहरात तर संपूर्ण प्रचार मराठीतून केला जातोय.

गरज भासल्यास महाराष्ट्रातून मराठी भाषिकांना तेलंगणात बोलावलं जातंय. त्यासाठी प्रचारकांना चांगला मोबदलाही मिळतोय. प्रचार फेऱ्या, रॅली, बैठक, सभांमध्येही मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. मराठीतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं, मराठी गाण्यांच्या माध्यमातून प्रचार, उपहासात्मक टिप्पणी यावर अधिक लक्ष दिलं जातंय. ‘अबकी बार, किसान सरकार’ हा सत्तेवर असलेल्या भारत राष्ट्र समितीचा नारा आहे. बीआरएसदेखील मराठीचाच प्रचारासाठी वापर करतेय. भाजप, काँग्रेसही यात मागे नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणात विधानसभा निवडणूक असल्यानं अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेतली. सभेपूर्वी ‘लँडिंग’ करण्यासाठी राहुल यांच्या हेलिकॉप्टरनं गडचिरोलीतील मेडिगड्डा प्रकल्पाची जागा निवडली. प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेतल्यानंतरही राहुल यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री राव आणि बीआरएसवर जोरदार हल्ला चढवला. तेलंगणातील निवडणुकीवर राहुल गांधी स्वत: लक्ष ठेवून आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जोर लावत आहेत. सर्वच विरोधी पक्षांनी मेडीगड्डा प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दाच मुख्यत्वेकरून केंद्रित केलाय.

महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमेवर असलेल्या १४ गावांचा मुद्दाही अद्याप कायम आहे. या गावांमधील मतदार दोन्ही राज्यांतील निवडणुकीत सहभागी होतात. तेलंगणात निवडणूक असेल तेव्हा तिकडे मतदान करतात. जेव्हा महाराष्ट्रात निवडणूक असेल तेव्हा या बाजूनं मतदार करतात. त्यामुळेच या गावांमध्ये मराठीवर सर्वच राजकीय पक्ष जोर देताहेत. ऐन दिवाळीपूर्वी सीमावर्ती भागांमध्ये सध्या राजकीय आतषबाजी जोरात सुरू आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Election in Telangana
Tumsar BRS News : चरण वाघमारेंचे ‘केसीआर’च्या पावलावर पाऊल, गुलाबी वादळ घेऊन धडकले एसडीओ ऑफिसवर !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com