Vanchit To RSS : हिंदूराष्ट्र नव्हे संविधानानुसार देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा!

Memorandum : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं दिलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुखांना निवेदन
Vanchit Bahujan Aaghadi Akola
Vanchit Bahujan Aaghadi AkolaSarkarnama
Published on
Updated on

Akola News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा तिरंगा आणि संविधान नाकारत आली आहे. संघाचा अजेंडा हा हिंदूराष्ट्र आहे. अशात संघ ज्या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतो. त्यांनीही देशात अराजकता निर्माण केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदूराष्ट्राचा हट्ट सोडत संविधानाच्या आधारावर देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अकोला येथे दिलय.

संघप्रमुख डॉ. भागवत रविवारी (ता. १९) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना निवेदन देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी रात्रीच जाहीर केलं होतं. (Vanchit Bahujan Aaghadi Appeal RSS Chief Mohan Bhagwat At Akola to Forget Concept Of Hindu Rashtra & Take Country Ahead As Per Constitution of India)

वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी रात्री निवदेन देणार असल्याची घोषणा करताना अकोला जिल्हा पोलिस विभाग कामाला लागला. संघप्रमुख डॉ. मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सशस्त्र सुरक्षा आहेत. त्यामुळं त्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांनी शनिवारपासूनच वंचितच्या पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातही याबद्दल चर्चा होती.

रविवारी डॉ. भागवत अकोल्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, विभागीय अध्यक्ष बालमुकुंड भीरड, पश्चिम अकोलाचे कार्याध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, अॅड. संतोष राहटे, पूर्व अकोलाचे अध्यक्ष शंकर इंगळे, आदिवासी समाजाच्या नासरी चव्हाण यांना गाठत त्यांना थांबविले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. मोहन भागवत यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधला व वंचितच्या शिष्टमंडळाला निवेदन द्यायचे असल्याबाबत कळविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरसंघचालकांचे स्वीय सहाय्यक बिडवे यांनी याबाबत डॉ. भागवत यांना सूचित केले. परंतु डॉ. भागवत यांची प्रत्यक्ष निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं वंचितनं डॉ. भागवत यांचे स्वीय सहाय्यक बिडवे यांच्यामार्फत त्यांना निवेदन दिले, असं डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलं. निवदेनामध्ये म्हटलय की, देशात बहुजन, अल्पसंख्यक, आदिवासी, मराठा, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त समाजात कलह निर्माण होत आहेत. संघ हिंदू राष्ट्राची पाठराखण करतो. आरएसएस भाजपला समर्थन देते. भाजपने देशात अराजकतेचे धोरण स्वीकारलेय. त्यामुळं संघानं यासंदर्भात हस्तक्षेप करीत भाजपला अराजकता, जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार थांबविण्यास सांगावे. संघानेही हिंदूराष्ट्रापेक्षा संविधानात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करावे.

डॉ. भागवत यांचा दौरा आणि वंचित बहुजन आघाडीचं निवेदन यामुळं पोलिस प्रशासन शनिवारी रात्रीपासूनच चिंतेत होतं. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन संघप्रमुख जिल्ह्यात जेथे जेथे जाणार होते, त्या सर्व भागांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. डॉ. भागवत यांचा दौरा सुरू होता, तोपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी पूर्णवेळ त्यांच्या ताफ्यासह सतर्क होते.

Edited by : Prasannaa Jakate

Vanchit Bahujan Aaghadi Akola
RSS Meeting : मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर संघाच्या बैठकीत विचारमंथन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com