Akola : अहंकार बाजूला ठेवत वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घ्याच!

Vanchit Bahujan Aaghadi : सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून महाविकास आघाडीला साद
Vanchit Bahujan Aaghadi's Post.
Vanchit Bahujan Aaghadi's Post.Google
Published on
Updated on

Dhairavardhan Pundkar : वंचित बहुजन आघाडीला अद्यापही महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट टाकत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपला अहंकार बाजूला ठेवत ‘वंचित’ला आपल्यासोबत आघाडीत समाविष्ट करण्याची साद घातली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असेल तर, ‘वंचित’ला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याची मागणी यातून करण्यात आलीय. अकोला येथुन ही साद घालण्यात आलीय.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केलीय. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशावरून सोशल मीडियावरच पक्षांकडून चर्चा सुरू करण्यात आली आहे. ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याबाबत अद्यापही साशंकता आहे.

Vanchit Bahujan Aaghadi's Post.
Akola News : मालमत्ता करविरोधातील आंदोलनात शिवसेना आणखी आक्रमक

‘वंचित’कडून महाविकास आघाडीला इशारा देण्यात आलाय. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नाही, तर अॅड. प्रकाश आंबेडकर प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देऊ शकतात. त्यामुळे त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर होते. लोकसभेत ‘वंचित’च्या उमेदवारांनी 41 लाखावर मतदान घेतलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेणं महाविकास आघाडीला महागात पडू शकतं.

‘वंचित’कडून पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर (एक्स) ट्विट करीत हा इशारा देण्यात आलास. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने इतिहासातून युती करण्याचे महत्त्व शिकले पाहिजे. वेगवेगळ्या देशांच्या युतीने हिटलरचा पराभव झाला. महाविकास आघाडीने अद्याप ‘वंचित’ला आघाडीत का आमंत्रित केलं नाही, हे महाराष्ट्रातील लोकांसाठी सर्वात मोठे रहस्य आहे. एकतर महाविकास आघाडी ‘वंचित’च्या वाढत्या लोकप्रियतेपासून आंधळी आहे. त्यांनी ‘वंचित’च्या महासभांमधील ताकद पाहिलेली नाही किंवा त्यांचा अहंकार त्यांना ‘वंचित’ला आघाडीत घेण्यापासून रोखत आहे. कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही भेदभाव आणि उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षांची मदत घ्यायची नसेल, असंही ‘वंचित’ने आपल्या व्हिडीओ पोस्टमध्ये नमूद केलय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खरोखरच भाजपचा पराभव करायचा असेल, तर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवावा. अधिकृतपणे ‘वंचित’ला महाविकास आघाडीतमध्ये सहभागी करून घ्यावे. पक्षाचा अहंकार आणि युती करण्‍यात आलेले अपयश काय करू शकते, हे सर्वांनी पाहिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही अगदी अलीकडची उदाहरणं आहेत, असं सांगत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर थेट प्रश्न उभा केलाय. पक्षाचे प्रवक्ता तथा उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी ही व्हिडीओ पोस्ट टाकली होती. पक्षाची हिच भूमिका असल्याचे संकेत देत ‘वंचित’च्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून ही पोस्ट व्हारल करण्यात आलीय.

Edited by : Prasannaa Jakate

Vanchit Bahujan Aaghadi's Post.
Akola Vanchit Aaghadi : जोरदार मोर्चेबांधणी करीत ‘वंचित’नं तयार केला रोडमॅप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com